Bigg Boss 16 | साजिद खानमुळे बिग बॉसच्या निर्मात्यांची वाढली डोकेदुखी, अखेर घेतला हा निर्णय?
बिग बॉस 16 मध्ये नेमके कोणते स्पर्धक सहभागी होणार हे जाणून घेण्यासाठी चाहत उत्साही होते. मात्र, बिग बॉसच्या घरात साजिद खानला बघितल्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

मुंबई : रिअॅलिटी शो बिग बॉसच्या (Bigg Boss 16) निर्मात्यांची डोकेदुखी सध्या वाढलीये. साजिद खान बिग बॉस 16 च्या घरात दाखल झाल्यापासून मोठा वाद बाहेर सुरूय. बिग बॉसच्या घरात साजिद खान सर्वांसोबत चांगला राहत असताना बाहेर प्रचंड गदारोळ सुरू झालाय. दिवसेंदिवस साजिद खानच्याविरोधातील (Sajid Khan) मोहिम जोर पकडू लागलीये. अनेक अभिनेत्री आता सोशल मीडियावर थेट व्हिडीओ शेअर करत साजिद खानने आपल्यासोबत कसा छळ केला हे सांगत आहेत. इतकेच नव्हे तर साजिद खानमुळे सलमान खानवरचा (Salman Khan) रोषही वाढतोय.
बिग बॉस 16 मध्ये नेमके कोणते स्पर्धक सहभागी होणार हे जाणून घेण्यासाठी चाहत उत्साही होते. मात्र, बिग बॉसच्या घरात साजिद खानला बघितल्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. आता अनेक अभिनेत्री पुढे आल्या असून बिग बॉसच्या घरातून साजिद खानला बाहेर काढा असे म्हणत बिग बॉसच्या निर्मात्यांवर दबाव आणत आहेत. अशा व्यक्तीला तुम्ही बिग बॉसच्या घरात कसे घेऊ शकता असा प्रश्न अभिनेत्री उपस्थित करत आहेत. यामुळे पुढच्या आठवड्यात साजिदला बिग बॉसच्या घराबाहेर काढणार असून याला सलमान खानने देखील होकार दिल्याचे कळत आहे.
साजिद खानवर यापूर्वी अनेक अभिनेत्रींनी MeToo चा आरोप केलाय. मात्र, असे असताना देखील साजिद खानला बिग बॉसच्या घरात सहभागी केल्याने लोकांना मोठा धक्का बसला. सलमान खानच्या आर्शिवादामुळे साजिद खानला बिग बॉसच्या घरात येता आले, असाही गंभीर आरोप केला जातोय. साजिद खानची बहीण फराह खान सलमान खानच्या जवळची असल्याने साजिद बिग बॉसमध्ये सहभागी झाल्याचे देखील सांगण्यात येतंय.