AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’च्या दिग्दर्शकाला थेट धमक्यांचे फोन, प्रदर्शनाआधीच…प्रकरण काय?

Maharashtra Epstein Files : 'महाराष्ट्र एप्सटिन फाईल्स' या सिनेमाच्या दिग्दर्शकाला धमकीचे फोन येत आहेत. सिनेमातील एका पात्राच्या आडनावरून धमकीचे फोन येत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'च्या दिग्दर्शकाला थेट धमक्यांचे फोन, प्रदर्शनाआधीच...प्रकरण काय?
| Updated on: Nov 05, 2026 | 9:18 PM
Share

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ या आगामी चित्रपटामुळे सध्या मनोरंजनविश्वासह राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी आपल्याला धमकीचे फोन येत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. चित्रपटातील एका पात्राच्या आडनावावरून काही लोक आक्षेप घेत असून चित्रपट थांबवण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ हा चित्रपट समाजप्रबोधनाच्या उद्देशानं बनवण्यात आल्याचं स्वरूप सावंत यांनी स्पष्ट केलं. प्रत्येक व्यक्तीचं समाजासाठी काहीतरी योगदान असतं आणि आपण आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून समाजात बदल घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, चित्रपटाच्या निमित्तानं सध्या त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही लोकांकडून त्यांना सातत्याने फोन येत असून दिवसाला तब्बल २५ ते ३० फोन येत असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकारामुळे आपली मानसिक शांतता हरवली असून रात्री झोपही लागत नसल्याचं त्यांनी सांगितलं.

चित्रपटातील ‘थोरात’ आडनावावर आक्षेप

स्वरूप सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटातील मुख्य पात्राच्या नावासाठी ‘थोरात’ हे आडनाव वापरण्यात आलं आहे. मात्र, या आडनावावरून काही लोकांनी आक्षेप घेतला आहे. ‘थोरात’ आडनाव वापरू नका, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात असल्याचं दिग्दर्शकांनी सांगितलं. मात्र, चित्रपटाचं काम पूर्ण झाल्यानंतर आता पात्राचं आडनाव बदलणं शक्य नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या आडनावाच्या मुद्द्यावरून चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. राजकीय दबाव असू शकतो, असंही ते म्हणाले.

चित्रपटाच्या कमाईतील काही हिस्सा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी

या चित्रपटातून मिळणाऱ्या नफ्यातील काही टक्के रक्कम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी देण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतल्याचं स्वरूप सावंत यांनी सांगितलं. चित्रपटाचा उद्देश केवळ मनोरंजन नसून समाजातील महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करणे आणि गरजू लोकांना मदत करणे हा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. चित्रपटामुळे महाराष्ट्राची बदनामी होईल, असं कोणतंही काम आपण करणार नसल्याचं दिग्दर्शकांनी स्पष्ट केलं. चित्रपटाच्या माध्यमातून समाजासमोर काही प्रश्न मांडण्याचा आपला प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. या प्रकरणात राजकीय दबाव असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

‘मला कितीही धमक्या आल्या, तरी हा चित्रपट प्रदर्शित केल्याशिवाय आम्ही राहणार नाही,’ असा ठाम निर्धार स्वरूप सावंत यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता या चित्रपटाबाबत पुढे काय घडणार आणि आडनावावरून सुरू झालेला वाद कोणतं वळण घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
बीडच्या साडीची जाहिरात करण्यासाठी पंकजा मुंडे रॅम्प वॉक करणार; नेमकं..
Pankaja Munde : बीडच्या साडीची जाहिरात करण्यासाठी पंकजा मुंडे रॅम्प वॉक करणार; नेमकं काय म्हणाल्या?
मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लीपच्या सोअर्स संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर...
Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लीपच्या सोअर्स संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर  ठेवली अट, म्हणाले...
दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर....
Vivekanand Patil On Farmers Loan : दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर..., विवेकानंद पाटलांचं शेतकऱ्यांना आवाहन
जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच!
Devendra Fadnavis Vs Rahul Gandhi : जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच! मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर पलटवार
शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस...
ST Employees Diwali Bonus : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस जाहीर
परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं....
MPSC : परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं अहवालात काय?
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय,
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय, गावागावांत पोहोचणार पिण्याच्या पाण्याचे टँकर
सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदार....
Sunil Tatakare : सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदारसंघांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, राजीनाम्यामागचं कारण काय?