AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : गरिबी दूर करणारी झाडं, वास्तुशास्त्र काय सांगतं?

हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्र महत्त्वाचं मानलं गेलं आहे. वास्तुशास्त्रामध्ये काही फोटो, वनस्पती या शुभ माण्यात आल्या आहेत. आज आपण अशा काही वनस्पतींची माहिती घेणार आहोत, ज्यांना वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. या झाडांमुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते.

Vastu Shastra : गरिबी दूर करणारी झाडं, वास्तुशास्त्र काय सांगतं?
Vastu ShastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 05, 2026 | 8:45 PM
Share

हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला महत्त्वाचं मानण्यात आलं आहे. तुमच्या घराची रचना कशी असावी? इथपासून ते तुमच्या घरात ज्या काही वस्तू आहेत, त्या कोणत्या दिशेला ठेवाव्यात? इथपर्यंत वास्तुशास्त्रामध्ये मार्गदर्शक करण्यात आलं आहे. जर वास्तुशास्त्राच्या नियमांचं पालन केलं तर घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते, घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि ऊर्जा संतुलन साधलं जातं, अशी मान्यता आहे. ज्या घरात ऊर्जा संतुलन असतं, अशा घरावर कधीही कोणतंही संकट येत नाही. मात्र ज्या घरात कायम नकारात्मक ऊर्जा असते, अशा घरात सातत्याने संकटांची मालिका सुरूच असते. आज आपण अशा काही झाडांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्यांना वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. या झाडांमुळे घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहतो, घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात, एवढंच नाही तर जर तुमच्या हातात पैसा टिकत नसेल तर ती समस्या देखील यामुळे दूर होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

शमीचं झाड – वास्तुशास्त्रामध्ये शमीच्या झाडाला अत्यंत पवित्र माण्यात आलं आहे, वास्तुशास्त्रच नाही तर हिंदू धर्मशास्त्रामध्ये देखील शमीच्या झाडाचं मोठं महत्त्व आहे. ज्या घरात शमीचं झाडं असतं, त्या घराचं सर्व प्रकारच्या वाईट ऊर्जेपासून संरक्षण होतं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. एवढंच नाही तर ज्या घरात शमीचं झाड असतं, त्या घरावर सदैव भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद असतो, अशी धार्मिक मान्यता आहे.

तुळस – हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. तुळस हे लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचं अत्यंत प्रिय झाड आहे. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात तुळशीचं झाडं आहे, त्या घरात कधीही पैशाला कमी नसते. त्या घरावर सदैव भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद राहतो, अशी मान्यता आहे.

मनी प्लांट – मनी प्लांटच्या वेलाला वास्तुशास्त्र तसेच फेंग शुईमध्ये देखील महत्त्वाचं मानलं गेलं आहे. ज्या घरात मनी प्लांटचा वेल असतो, अशा घरामध्ये सदैव सकारात्मक ऊर्जा राहते, आर्थिक अडअडचणी येत नाहीत, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
बीडच्या साडीची जाहिरात करण्यासाठी पंकजा मुंडे रॅम्प वॉक करणार; नेमकं..
Pankaja Munde : बीडच्या साडीची जाहिरात करण्यासाठी पंकजा मुंडे रॅम्प वॉक करणार; नेमकं काय म्हणाल्या?
मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लीपच्या सोअर्स संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर...
Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लीपच्या सोअर्स संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर  ठेवली अट, म्हणाले...
दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर....
Vivekanand Patil On Farmers Loan : दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर..., विवेकानंद पाटलांचं शेतकऱ्यांना आवाहन
जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच!
Devendra Fadnavis Vs Rahul Gandhi : जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच! मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर पलटवार
शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस...
ST Employees Diwali Bonus : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस जाहीर
परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं....
MPSC : परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं अहवालात काय?
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय,
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय, गावागावांत पोहोचणार पिण्याच्या पाण्याचे टँकर
सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदार....
Sunil Tatakare : सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदारसंघांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, राजीनाम्यामागचं कारण काय?