AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्रीसोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप करत पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज; लेकाने बापालाच केलं अनफॉलो

या सुपरस्टारविरोधात पत्नीने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जात पत्नीने त्याच्यावर एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. या आरोपांदरम्यान आता त्याच्या मुलाने अनफॉलो केलं आहे.

अभिनेत्रीसोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप करत पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज; लेकाने बापालाच केलं अनफॉलो
दाक्षिणात्य सुपरस्टारImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 01, 2026 | 12:44 PM
Share

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजय सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. लग्नाच्या 27 वर्षांनंतर पत्नी संगीताने विजयशी घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. इतकंच नव्हे तर पत्नीने त्याच्यावर दुसऱ्या अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचाही आरोप केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून विजय आणि त्याची पत्नी वेगळे राहत आहेत. घटस्फोटाच्या या चर्चांदरम्यान आता विजयचा मुलगा जेसन संजय याने त्याला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. याप्रकरणी अद्याप विजय किंवा त्याच्या पत्नीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही. थलपती विजयचा मुलगा जेसन संजय नेहमीच प्रकाशझोतापासून लांब राहणं पसंत करायचा. घटस्फोटाच्या वृत्तांदरम्यान त्याने इन्स्टावरून वडिलांना अनफॉलो केलंय.

विजय आणि संगीता यांना जेसन हा मुलगा आणि दिव्या ही मुलगी आहे. संगीता सोरनलिंगमने 24 फेब्रुवारी रोजी चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात विजयशी घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यात तिने विजयवर एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. त्याचसोबत तिने असाही दावा केला आहे की विजयने तिच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर आणि आर्थिक सुरक्षेवर मर्यादा आणल्या आहेत. संगीतानेही याचिकेत असंही म्हटलं आहे की ज्या अभिनेत्रीसोबत विजयचे विवाहबाह्य संबंध आहेत, ती त्याच्यासोबत सोशल मीडियावर सतत आपले फोटो पोस्ट करत होती. यामुळे तिला आणि मुलांना सातत्याने अपमान सहन करावा लागला. चेंगलपट्टू फॅमिली कोर्टाने संगीताची याचिका स्वीकारली असून ती फॅमिली वेलफेअर कमिटीकडे पाठवण्यात आली आहे. संगीताने विजयकडे पोटगीची मागणीसुद्धा केली आहे. याप्रकरणी येत्या 20 एप्रिल रोजी पुढील सुनावणी होईल.

View this post on Instagram

A post shared by Vijay (@actorvijay)

थलपती विजय आणि संगीता यांनी 1999 मध्ये प्रेमविवाह केला होता. संगीता ही श्रीलंकन तमिळ आहे. ती विजयची चाहती होती आणि चाहती म्हणूनच त्याच्याशी पहिली भेट झाली होती. नंतर हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. त्यावेळी थलपती विजय आणि संगीताने हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न केल्याचं म्हटलं जातं. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत विजयचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. नुकतंच त्याने राजकारणातही प्रवेश केला आहे.

Follow Us
सलमाननंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर?
Aamir Khan Threat | सलमाननंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर? व्हायरल पोस्ट-ऑडिओमागचं सत्य काय?
माझा फोनदेखील... सोनम वांगचुक यांच्या पत्नी एकाएकी संतापल्या
माझा फोनदेखील... सोनम वांगचुक यांच्या पत्नी एकाएकी संतापल्या; रुग्णालय परिसरात असं काय घडलं?
हा लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस!
Amit Thackeray | हा लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस! सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून अमित ठाकरेंचा केंद्र सरकारवर घणाघात
NDA मध्ये येताच राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणार मोठं गिफ्ट?
NDA मध्ये येताच राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणार मोठं गिफ्ट? पडद्याआड हालचाली वाढल्या
भारताचा अवकाश क्षेत्रात नवा इतिहास! पहिलं खासगी रॉकेट लॉन्च
भारताचा अवकाश क्षेत्रात नवा इतिहास! पहिलं खासगी रॉकेट यशस्वीरित्या लॉन्च; पहा व्हिडीओ
अजून किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?
Uddhav Thackeray | अजून किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार? सरकारने जाहीर करावं; उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल!
सिया केतन प्रकरण! केतनच्या बहिणीची भावनिक हाक; न्यायासाठी थेट.....
सिया केतन प्रकरण! केतनच्या बहिणीची भावनिक हाक; न्यायासाठी थेट.....
भोंदू खरात प्रकरण पुन्हा चर्चेत! ED कडून तब्बल 3000 पानांचं... कोर्टात
Ashok Kharat | भोंदू खरात प्रकरण पुन्हा चर्चेत! ED कडून तब्बल 3000... कोर्टात नेमकं काय घडतंय?
केंद्रात तीन मंत्रिपदे हवीत, शिंदे सेनेची मोठी लॉबिंग; काय घडतंय?
Shivsena | केंद्रात तीन मंत्रिपदे हवीत, शिंदे सेनेची मोठी लॉबिंग; काय घडतंय?
रामगिरीवर खलबतं सुरू! मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला बावनकुळे दाखल; च
Chandrashekhar Bawankule Meet Devendra Fadnavis | रामगिरीवर खलबतं सुरू! मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला बावनकुळे दाखल; चर्चा गुलदस्त्यात?
जंतरमंतरवर जाताच अमित ठाकरेंनी वाढवले मोदी सरकारचे टेन्शन…दिल्लीतील आंदोलन देशभर पोहचवण्याची दिली हाक.

जंतरमंतरवर जाताच अमित ठाकरेंनी वाढवले मोदी सरकारचे टेन्शन…दिल्लीतील आंदोलन देशभर पोहचवण्याची दिली हाक

सोनम वांगचुक यांना अटक? बोलता बोलता भाजप नेत्या हे काय बोलून गेल्या? यूजर्सने घेतली फिरकी.

सोनम वांगचुक यांना अटक? बोलता बोलता भाजप नेत्या हे काय बोलून गेल्या? यूजर्सने घेतली फिरकी

सिया आणि सोनमपेक्षाही खतरनाक… झोपेच्या गोळ्या, नंतर चादरीत घुसवला साप, अंगावर काटा येणारं हत्याकांड; बायको बनली हैवान.

सिया आणि सोनमपेक्षाही खतरनाक… झोपेच्या गोळ्या, नंतर चादरीत घुसवला साप, अंगावर काटा येणारं हत्याकांड; बायको बनली हैवान

Sonam Wangchuk : खरचं मानलं पाहिजे, सोनम वांगचूक यांची लोकांच्या फायद्याची तीन जबरदस्त इनोवेशन्स, सायन्सने समाज बदलण्याची जिद्द.

Sonam Wangchuk : खरचं मानलं पाहिजे, सोनम वांगचूक यांची लोकांच्या फायद्याची तीन जबरदस्त इनोवेशन्स, सायन्सने समाज बदलण्याची जिद्द

Vikram 1 Launch : ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण, भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटमधून उपग्रहांचं यशस्वी लॉन्चिंग.

Vikram 1 Launch : ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण, भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटमधून उपग्रहांचं यशस्वी लॉन्चिंग

अभिमान वाटावा असंच… नीटमध्ये महाराष्ट्राची कन्या मुलींमध्ये देशात पहिली, कोण आहे श्रावणी कुदळे?.

अभिमान वाटावा असंच… नीटमध्ये महाराष्ट्राची कन्या मुलींमध्ये देशात पहिली, कोण आहे श्रावणी कुदळे?