Thank God: ‘थँक गॉड’ च्या मागचे विघ्न हटेना; रिलीज आधीच मध्यप्रदेशाच्या मंत्र्यांनी केली बॅनची मागणी

| Updated on: Sep 22, 2022 | 12:13 PM

इंदर कुमारच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट कुवेतच्या सेन्सॉर बोर्डाने पास केला नाही. म्हणजेच आता हा चित्रपट तिथे प्रदर्शित होऊ शकणार नाही. कर्नाटकात हिंदू जनजागृती समितीने चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत निदर्शने केली.

Thank God: थँक गॉड च्या मागचे विघ्न हटेना; रिलीज आधीच मध्यप्रदेशाच्या मंत्र्यांनी केली बॅनची मागणी
Ajay Devgn's
Image Credit source: Instagram
Follow us on

बॉलीवूड अभिनेता अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला ‘थँक गॉड'(Thank God) चित्रपटासद्या चांगलाच चर्चेत आहे. सोशल मीडियावर (Social Media) या चित्रपटाबाबतबॉयकॉट ट्रेंड चालल्याने हा चित्रपट चांगलाच अडचणीत आला आहे. हे कमी काय म्हणून आता कुवेतमध्ये यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचवेळी कर्नाटकातही या चित्रपटाला प्रचंड विरोध होत आहे. या चित्रपटात हिंदू देव (Hindu God)देवतांच्या बद्दल दाखवण्यात आलेल्या गोष्टींना प्रेक्षकांनी विरोध केला आहे.

अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अडचणी वाढत आहेत. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे, मात्र त्याआधीच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला, तेव्हाच सोशल मीडियावर विरोध सुरू झाला.

आता मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, भाजप नेते आणि शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी अनुराग ठाकूर यांना पत्र लिहिले आहे. अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या ‘थँक गॉड’ या चित्रपटात देवाचे रूप चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळेच त्यांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा

‘थँक गॉड’ चित्रपटाचा ट्रेलर 9 सप्टेंबर रोजी रिलीज झाला, त्याच दिवशी #BoycottThankGod ट्विटरवर ट्रेंड करू लागला. या चित्रपटात भगवान चित्रगुप्त यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप यूजर्सने केला आहे. लोकांनी चित्रपटाच्या निर्मात्यांवर हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप केला आणि चित्रपटाला जोरदार विरोध केला.

इंदर कुमारच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट कुवेतच्या सेन्सॉर बोर्डाने पास केला नाही. म्हणजेच आता हा चित्रपट तिथे प्रदर्शित होऊ शकणार नाही.
कर्नाटकात हिंदू जनजागृती समितीने चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत निदर्शने केली. बॉलीवूडमध्ये हिंदू देवदेवतांची खिल्ली उडवणे हा ट्रेंड बनला . आहे, असे युझर्सचे म्हणणे आहे. यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घातली पाहिजे अशी मागणी केली जात आहे.