AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘द केरळ स्टोरी 2’चा सॉलिड सरप्राइज; कोर्ट केस-वादविवाद झुगारून दमदार कमाई

The Kerala Story 2: प्रदर्शनाच्या वाटेत अनेक अडथळे येऊनही 'द केरळ स्टोरी 2' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी आश्चर्यकारक कमाई केली. विशेष म्हणजे चित्रपटाच्या प्रदर्शनावरून संभ्रम असतानाही तिकिट विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

'द केरळ स्टोरी 2'चा सॉलिड सरप्राइज; कोर्ट केस-वादविवाद झुगारून दमदार कमाई
The Kerala Story 2Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 01, 2026 | 10:15 AM
Share

विपुल शाह निर्मित ‘द केरळ स्टोरी 2’ या चित्रपटावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. प्रदर्शनाच्या एक दिवस आधी केरळ उच्च न्यायालयात या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून सुनावणी झाली. त्यानंतर शुक्रवारी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु शुक्रवारी फक्त हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झालाच नाही तर बॉक्स ऑफिसवर त्याने दमदार सुरुवातदेखील केली आहे. शुक्रवारी सकाळी काही ठिकाणी याचे शोज रद्द होऊन आणि केरळ उच्च न्यायालयाकडून हिरव्या कंदिलाची प्रतीक्षा करूनही पहिल्या दिवशी थिएटरमध्ये बऱ्यापैकी प्रेक्षक जमले होते. ‘द केरळ स्टोरी 2’ हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा सीक्वेल आहे. केरळ राज्यात बळजबरीने केल्या जाणाऱ्या धर्मांतराचा मुद्दा पहिल्या भागात मांडण्यात आला होता. त्यानंतर आता दुसऱ्या भागात दुसऱ्या राज्यांमधील कथा दाखवण्यात आली आहे.

‘बुक माय शो’ या तिकिट बुकिंग अॅपच्या ट्रेंडिंग टिकरनुसार 24 तासांत (शुक्रवारी सकाळी 9 वाजल्यापासून शनिवारी सकाळी 9 वाजेपर्यंत) ‘द केरळ स्टोरी 2’ या चित्रपटाचे 21 हजारांहून अधिक तिकिट विकले गेले. गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या तापसी पन्नूच्या ‘अस्सी’ या चित्रपटाचेही इतकेच तिकिटं तिसऱ्या दिवशी विकले जात होते. ‘द केरळ स्टोरी 2’ने पहिल्याच दिवशी हा आकडा गाठला. या तिकिट विक्रीचा फायदा बॉक्स ऑफिस कलेक्शनवरही दिसून आला.

ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, ‘द केरळ स्टोरी 2’ने पहिल्याच दिवशी 3.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हा आकडा जरी लहान वाटत असला तरी या चित्रपटाच्या वाटेत आलेल्या अडथळ्यांच्या तुलनेत हे एक प्रकारचं यशच आहे. गुरुवारी केरळ उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगितीचे आदेश दिले होते. त्यानंतर चित्रपटाच्या टीमने दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर पुन्हा अपील केलं. रात्री उशिरापर्यंत झालेल्या या सुनावणीनंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यामुळे शुक्रवारी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होईल की नाही, हे स्पष्ट झालं नव्हतं. यामुळे शुक्रवारी सकाळी काही ठिकाणी चित्रपटाच्या तिकिटांची विक्री झाली नाही. 2023 मध्येही ‘द केरळ स्टोरी’च्या प्रदर्शनापूर्वी अशाच प्रकारे वाद झाला होता. परंतु अदा शर्माच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 8 कोटी रुपये कमावले होते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...