AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Kerala Story 2 पाहिल्यानंतर लोकांनी मुस्लिमांबद्दल घेतला अत्यंत टोकाचा निर्णय, ठरवलं यापुढे…VIDEO व्हायरल

The Kerala Story 2: 'द केरळ स्टोरी 2' पाहिल्यानंतर थिएटरमध्ये असं झालं तरी काय? ज्यामुळे मुस्लिमांबद्दल घेतला अत्यंत टोकाचा निर्णय, ठरवलं यापुढे...VIDEO व्हायरल

The Kerala Story 2 पाहिल्यानंतर लोकांनी मुस्लिमांबद्दल घेतला अत्यंत टोकाचा निर्णय, ठरवलं यापुढे...VIDEO व्हायरल
| Updated on: Mar 18, 2026 | 8:44 AM
Share

The Kerala Story 2: ‘द केरळ स्टोरी’ सिनेमानंतर ‘द केरळ स्टोरी 2’ सिनेमा प्रदर्शित झाला. अनेक जण सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात पोहोचत आहेत. अशात पालघर जिल्ह्यातून एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लोक चित्रपटगृहात नारे लावताना आणि मुस्लिमांवर सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार घालण्याची शपथ घेताना दिसत आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी टीका देखील केली आहे. काँग्रेस खासदाराने असा दावा केलाय की, संबंधित व्हिडीओ 10 मार्चचा असून वसई येथील चित्रपटगृहात शूट केला आहे… यानंतर, मीरा-भयंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवार, 17 मार्च रोजी व्हिडीओबद्दल सांगितलं की, व्हिडिओची सत्यता अद्याप पडताळली गेली नाही.

‘व्हिडीओ नक्की कुठे आणि कधी शूट करण्यात आलाय याबद्दल सध्या काहीही सांगू शकत नाही. पण आम्हाला वाटतं की हे काही उपद्रवी घटकांचे कृत्य असू शकतं…’ असं देखील पोलीस अधिकारी म्हणाले. तर खासदाराने केलेल्या दाव्यानुसार, व्हिडीओमध्ये ‘द केरळ स्टोरी 2’ सिनेमा पाहिल्यानंतर मुस्लीम लोकांवर बहिष्कार घालण्याची शपथ घेतली… काँग्रेसचे राज्यसभा सदस्य सय्यद नासिर हुसेन यांनी हा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर केला आहे.

सय्यद नासिर हुसेन एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले, ‘पालघल जिल्ह्यातील वसई येथे 10 मार्च रोजी ‘द केरळ स्टोरी 2′ सिनेमातं मोफत प्रदर्शन कण्यात आलं… जेथे सिनेमा पाहिल्यानंतर मुस्लिमांवर सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार घालण्याची शपथ अनेकांनी घेतली… भाजप सरकारच्या काळात प्रचारकी विचारधारेला सतत प्रोत्साहन मिळत असल्यामुळे मुस्लिमांना वाढत्या प्रमाणात लक्ष्य केलं जात आहे. जेव्हा संपूर्ण समाजाला कलंकित करण्यासाठी सिनेमाचा राजकीय साधन म्हणून वापर केला जातो, तेव्हा पूर्वग्रहाचे संघटित भेदभावात रूपांतर होण्याचा आणि मुस्लिमविरोधी भावनांना आणखी खतपाणी घालण्याचा धोका असतो…’ असं देखील सय्यद नासिर हुसेन म्हणाले.

‘द केरळ स्टोरी 2’ सिनेमावर आक्षेप

‘द केरळ स्टोरी 2’ सिनेमाचा सिक्वल 27 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित करण्यात आला. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी आणि सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अनेक वाद झाले. सिनेमात उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा, आणि अदिति भाटिया यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. सिनेमाने आतापर्यंत 48.86 कोटींची कमाई केली आहे.

Follow Us
मोठी घडामोड! सुप्रिया सुळे 8 खासदारांसह पंतप्रधान मोदींना भेटणार
मोठी घडामोड! सुप्रिया सुळे 8 खासदारांसह पंतप्रधान मोदींना भेटणार; आज दिल्लीच्या बैठकीत काय निर्णय होणार?
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...