Mallika Sherawat : युरोपियन पुरुष हे भारतीय पुरुषांपेक्षा..मल्लिका शेरावत श्वेता तिवारीसाठी करणार एक खास काम
मल्लिका शेरावतच्या 'द ट्रेटर्स 2' मधील एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. श्वेता तिवारीशी बोलताना तिने युरोपीय पुरुषांची भारतीय पुरुषांशी तुलना करत, युरोपीय पुरुष अधिक चांगले असल्याचे सूचित केले. या विधानामुळे सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असून, अनेक नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

‘द ट्रेटर्स’ सीजन 2च्या प्रीमियरपासूनच हा शो चर्चेत आहे. त्यातच आता अभिनेत्री मल्लिका शेरावतच्या (Mallika Sherawat) एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे. या शोच्या सहाव्या एपिसोडमध्ये मल्लिकाने भारतीय पुरुषांच्या तुलनेत युरोपीय पुरुष अधिक चांगले असल्याचं सूचित केलं. श्वेता तिवारीशी बोलताना तिने हे विधान केलं. मात्र तिच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर खळबळ माजली असून नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. खरंतर श्वेता तिवारीसाठी मॅचमेकरची भूमिका निभावण्याचा मल्लिका शेरावतचा मनसुबा होता पण युरोपीय पुरूष आणि भारतीय पुरूशांची तिने तुलना केली, जे अनेकांना रुचलं नाही. त्यावरून बरीच टीका होत्ये.
जेव्हा मल्लिका, श्वेता आणि रिया चक्रवर्ती बिलियर्ड्स रूममध्ये गप्पा मारत होत्या, तेव्हाच हा विषय निघाला. “ मी वचन दिलंय की तिची भेट एका चांगल्या युरोपीय पुरुषाशी करून देईन, जो तिच्यावर खूप प्रेम करेल आणि तिचे कौतुक करेल” असं मल्लिकाने म्हटलं. मात्र यानंतर रिया चक्रवर्तीने मल्लिकाला थेट विचारलं की, “डेटिंगच्या बाबतीत युरोपीय पुरुष भारतीय पुरुषांपेक्षा चांगले असतात का?” तिचा तो प्रश्न ऐकून मल्लिका आश्चर्यचकित झाली. “ हा काही विचारण्यासारखा प्रश्न आहे का? तुझं डोकं खराब झालं आहे का? ” असं तिने उलट रियालाच विचारलं, त्यावर रेहा “हो” असं म्हणाली. मात्र ते ऐकून पुढे मल्लिका म्ह णाली, “मी नक्कीच व्यवस्था करेन”. त्यांचं हे बोलणं ऐकून श्वेताला मात्र हसू अनावर झालं. तुम्ही माझ्यामागे का लागलाय, असा प्रश्न तिने मजेत विचारला.
सोशल मीडियावर यूजर्स नाराज
मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी नाराज झाले आहेत. काही यूजर्सनी मल्लिकाच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. “तू सर्व भारतीय पुरुषांना एकाच श्रेणीत तोलू नकोस, तस न करताही तुला युरोपीय पुरुष आवडू शकतात ” असं एकाने लिहीलं. तर “या तुलनेला काहीच अर्थ नाही. चांगली आणि वाईट माणसं प्रत्येक ठिकाणी असतात” असं दुसऱ्या युजरने तिला सुनावलं. आणखी एका यूजरनेही मल्लिकाच्या वक्तव्यावर उपरोधिक टिप्पणी केली. “मल्लिका म्हणत्ये की युरोपीय पुरुष चांगले असतात, जसं काही तिने ग्लोबल डेटिंगच सर्व्हेच केलाय ना ” असा टोमणा तिने मारला. “ युरोपीय पुरुष भारतीय पुरुषांपेक्षा चांगले असतात का? हे तर खूच मोठं विधान आहे, असं बोलणं योग्य नाही ” असं म्हणत आणखी एका युजरने मल्लिकावर टीकास्त्र सोडलं.
दरम्यान, ‘द ट्रेटर्स’ सीझन 2 मध्ये सतत स्पर्धक बाहेर होत आहेत, कारण त्यांच्या गटात असलेल्या फसवणूक करणाऱ्या स्पर्धकांची ओळख पटवण्याचा त्याचा प्रयत्न आहे.