AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वतःच्या मुलीसोबत लिपलॉक ते दोन लग्न आणि बरंच काही…,प्रसिद्ध सेलिब्रिटीचे वादग्रस्त प्रकरणं

Bollywood: स्वतःच्या मुलीसोबत लिपलॉक, दोन लग्न, अनेक अभिनेत्रींसोबत नको ते फोटो, व्हिडीओ... प्रसिद्ध सेलिब्रिटीचे वादग्रस्त प्रकरणं... वयाच्या 75 व्या वर्षी देखील सेलिब्रिटी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतो चर्चेत...

स्वतःच्या मुलीसोबत लिपलॉक ते दोन लग्न आणि बरंच काही...,प्रसिद्ध सेलिब्रिटीचे वादग्रस्त प्रकरणं
| Updated on: Sep 20, 2024 | 2:47 PM
Share

झगमगत्या विश्वातील अनेक गोष्टी कायम चाहत्यांसमोर येत असतात. त्यामधील काही चांगल्या असतात, तर काही वाईट… बॉलिवूडमध्ये असा एका सेलिब्रिटी आहे जो त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. सध्या ज्या सेलिब्रिटीची चर्चा रंगली आहे तो सेलिब्रिटी दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते महेश भट्ट आहेत. आज महेश भट्ट यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्याबद्दल अशा काही गोष्टी जाणून घेऊ ज्यामुळे महेश भट्ट वादाच्या भोवऱ्यात अडकले…

महेश भट्ट कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत राहिले. स्वतःच्या मुलीसोबत लिपलॉक ते दोन लग्नापर्यंत महेश यांचं खासगी आयुष्य चर्चेत राहिलं. एवढंच नाही तर, अनेक नव्या अभिनेत्रींसोबत देखील त्यांचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यमुळे महेश भट्ट वादाच्या भोवऱ्यात अडकले.

महेश भट्ट आणि मुलगी पूजा भट्ट यांचे काही फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एक काळ असा होता, जेव्हा महेश भट्ट यांनी एक मॅगझीनच्या कव्हर फोटोसाठी स्वतःच्या मुलीसोबत लिप-लॉक केलं होतं. तेव्हा पूजा भट्ट फक्त 15 वर्षांची होती. आजही त्या फोटोमुळे महेश भट्ट चर्चेत असतात.

महेश भट्ट यांचं पहिलं लग्न..

महेश भट्ट यांचं पहिलं लग्न ब्रिटिश महिला लॉरेन ब्राइट यांच्यासोबत झालं होतं. लग्नानंतर महेश भट्ट यांनी पत्नीचं नाव बदललं आणि किरण ठेवलं. लग्नानंतर देखील महेश यांचं अभिनेत्री परवीन बाबी यांच्यासोबत अफेअर सुरु होते. अशात महेश यांनी पत्नी आणि लेक पूजा यांना देखील सोडलं होतं. त्यानंतर महेश भट्ट यांनी परवीन बाबी यांच्यासोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहाण्यास सुरुवात केली.

दरम्यान, परवीन बाबी सतत आजारी राहू लागल्या. परवीन यांना स्मृतीभ्रंश झाल्याचं समजताच महेश भट्ट अभिनेत्रीला सोडून पत्नीकडे परतले. यानंतर परवीन यांचा 2005 मध्ये तिचा मृत्यू झाला. परवीन आणि महेश भट्ट यांच्या नात्याच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.

दुसऱ्या लग्नासाठी स्वीकारला इस्लाम धर्म

परवीन बाबी यांच्यानंतर महेश भट्ट यांचा जीव सोनी राजदान यांच्यावर जडला. ‘सारांश’ सिनेमा दरम्यान महेश भट्ट आणि सोनी राजदान यांची भेट झाली. पहिल्या पत्नीला घटस्फोट देवून माझ्यासोबत लग्न करा… अशी अट सोनी यांनी दिग्दर्शका पुढे ठेवली. पण त्यांनी असं केलं नाही.

अखेर दुसरं लग्न करण्यासाठी महेश भट्ट यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. त्यानंतर महेश भट्ट आणि सोनी राजदान यांनी लग्न केलं. लग्नानंतर सोनी राजदान यांनी आलिया भट्ट आणि शाहिन भट्ट यांना जन्म दिला.

रिया चक्रवर्ती सोबत खासगी फोटो

महेश भट्ट यांचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत असलेल्या खासगी फोटोंमुळे चर्चेत आले. यामध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचाही समावेश आहे. महेश भट्ट यांच्यासोबतचे रियाचे विचित्र फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर दोघांनाही ट्रोल करण्यात आलं.

अभिनेत्री जिया खान हिच्यासोबत महेश भट्ट

दिवंगत अभिनेत्री जिया खानचा महेश भट्ट यांच्यासोबतचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. 2000 मध्ये दोघांचे फोटो व्हायरल झाले होते. अशा अनेक कारणांमुळे महेश भट्ट वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...