AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा चित्रकार होता माधुरीचा सर्वात मोठा चाहता, एका पेंटिंगचे मिळालेले 118 कोटी रुपये, 12 वेळा पाहिलेला हम आपके हैं कौन

हा चित्रकार होता माधुरी दीक्षितचा सर्वात मोठा चाहता, ज्याने माधुरीचा हम आपके हैं कोन हा चित्रपट 12 वेळा पाहिला होता. त्यांची एक पेंटिंग 118 कोटी रुपयांना विकली होती.

हा चित्रकार होता माधुरीचा सर्वात मोठा चाहता, एका पेंटिंगचे मिळालेले 118 कोटी रुपये, 12 वेळा पाहिलेला हम आपके हैं कौन
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 17, 2026 | 1:47 PM
Share

भारतीय चित्रकलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळवून देणारे प्रसिद्ध चित्रकार मकबूल फिदा हुसेन यांची कला आणि व्यक्तिमत्त्व आजही चर्चेत असते. उंच व्यक्तिमत्त्व, हातात ब्रश, पांढरी दाढी आणि अनवाणी पाय ही त्यांची खास ओळख होती. मात्र, त्यांच्या अनवाणी चालण्यामागे एका प्रसिद्ध कवीप्रती असलेला आदर आणि भावनिक नातं दडलं होतं.

एम.एफ. हुसेन यांचा जन्म 17 सप्टेंबर 1915 रोजी महाराष्ट्रातील पंढरपूर येथे झाला. त्यांचे बालपण इंदूरमध्ये गेले. लहानपणीच आईचे निधन झाल्याने त्यांच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली. पुढे त्यांच्या कलेमध्ये आई आणि महिलांच्या प्रतिमांना विशेष स्थान मिळाले.

चित्रकलेची आवड लहानपणापासूनच असल्याने त्यांनी या कलेतून कमाई करण्याचा मार्ग शोधला. 1930 च्या दशकात त्यांनी मुंबईत चित्रपटांचे होर्डिंग्ज आणि पोस्टर्स रंगवण्याचे काम सुरू केले. त्या काळात चित्रपटांचे मोठमोठे पोस्टर्स हाताने तयार केले जात असत. याच कामातून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

118 कोटी रुपयांना विकले गेले चित्र

1947 मध्ये एम.एफ. हुसेन हे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुपच्या स्थापनेत सहभागी झाले. भारतीय कलेला आधुनिक दृष्टिकोन देणे हा या समूहाचा उद्देश होता. त्यांच्या चित्रांमध्ये भारतीय संस्कृती, धार्मिक आणि ऐतिहासिक विषय तसेच सामान्य जीवनाचे प्रतिबिंब दिसून येत असे.

1950 आणि 1960 च्या दशकात त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भारतासह परदेशातही भरवण्यात आली. त्यांच्या कलेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. 1959 मध्ये टोकियो बिएनालेमध्ये त्यांना पुरस्कार मिळाला. 2025 मध्ये त्यांच्या एका चित्राची 118 कोटी रुपयांना विक्री झाल्याचे वृत्त आहे.

माधुरी दीक्षित आणि तब्बूसोबत बनवले चित्रपट

एम.एफ. हुसेन यांचा कल केवळ चित्रकलेपुरता मर्यादित नव्हता. त्यांना चित्रपटांचीही आवड होती. 1967 मध्ये त्यांनी ‘थ्रू द आयज ऑफ अ पेंटर’ हा चित्रपट तयार केला. या चित्रपटात राजस्थानमधील लोकजीवन, संस्कृती आणि रंगांचे चित्रण करण्यात आले होते. या चित्रपटाला बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये गोल्डन बेअर पुरस्कार मिळाला.

यानंतर त्यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत ‘गजगामिनी’ आणि तब्बूसोबत ‘मीनाक्षी: अ टेल ऑफ थ्री सिटीज’ हे चित्रपट बनवले. ‘हम आपके हैं कौन’ हा चित्रपट पाहिल्यानंतर हुसेन माधुरी दीक्षितच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाल्याचे सांगितले जाते. त्यांनी हा चित्रपट अनेकदा पाहिला होता.

Follow Us
मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक
Uddhav Thackeray : मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक, संभाजीनगरात आंदोलन
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत...
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत... नेमकं काय घडतंय?
पीक वाचवायचं तरी कसं? शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
Bhandara | पीक वाचवायचं तरी कसं? भंडाऱ्यात शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला पकडलं
LalBaug Raja : लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला कार्यकर्त्यांनी पकडलं
मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं!
Eknath Shinde | मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं कौतुक
मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं
Laxman Hake | मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं, लक्ष्मण हाके यांची जरांगेवर टीका
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य