गुलाबी शराराचा रेकॉर्ड धोक्यात? 1.47 कोटी लोकांनी पाहिलं हे गाणं, ऐकून तुम्ही देखील…
1.47 कोटी लोकांनी पाहिलं हे गाणं, ज्याने गुलाबी शरारा गाण्याचा रेकॉर्ड धोक्यात आणला आहे. आजही या गाण्याचे आहेत प्रचंड चाहते. नेमका गाण्याचा अर्थ काय?

उत्तराखंडचे पारंपरिक लोकसंगीत आता केवळ राज्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. भारतासह जगभरातील संगीतप्रेमींमध्येही या संगीताने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे ‘स्वामी परदेश’ हे गाणे. यूट्यूबवर या गाण्याने तब्बल 1.47 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळवत लोकप्रियतेचा नवा टप्पा गाठला आहे.
हे गाणे ‘भेजी भुला’ या अल्बममधील असून, उत्तराखंडच्या पारंपरिक लोकसंगीताला आधुनिक आणि आंतरराष्ट्रीय संगीतशैलीची जोड देण्याचा प्रयत्न या अल्बममधून करण्यात आला आहे. लोकधून, रॅप आणि आधुनिक संगीताचा अनोखा संगम असल्याने हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून सातत्याने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
लोकगायन आणि रॅपचा सुरेख संगम
‘स्वामी परदेश’ हे गाणे त्राटक म्युझिकने सादर केले आहे. या गाण्याला सूरज त्राटक, उदय सिंह रावत आणि सिराजी यांनी आपल्या आवाजातून वेगळी ओळख दिली आहे. त्याचबरोबर मंजू नौटियाल यांच्या पारंपरिक लोकगायकीमुळे गाण्याला उत्तराखंडच्या संस्कृतीचा अस्सल स्पर्श मिळाला आहे.
गाण्याच्या व्हिडिओमध्ये ऋतिका कैस्था प्रमुख भूमिकेत दिसतात. या गाण्याचे चित्रीकरण देहरादूनमधील डिंडियाली परिसरात करण्यात आले आहे. येथील नयनरम्य डोंगररांगा, हिरवाई आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे हे गाणे केवळ ऐकण्यापुरतेच नाही तर पाहण्यासही तितकेच आकर्षक ठरते. व्हिडिओचे दिग्दर्शन शुभम करणवाल यांनी केले असून, अजय धनोला, वासू मखलोगा आणि पंकज वैद्य यांनी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली आहे.
गाण्याची कथा काय सांगते?
‘स्वामी परदेश’ या गाण्याची कथा एका ग्रामीण महिलेभोवती फिरते. तिचा पती परदेशात कामासाठी गेला असून, गावात ती एकटीच राहिल्याने ती त्याच्याबद्दलची खंत व्यक्त करते. गाण्यातील पारंपरिक लोकगायनातून तिच्या भावना व्यक्त होतात तर त्यानंतर येणाऱ्या रॅपमधून कथेला नवे वळण मिळते.
रॅपच्या माध्यमातून पती तिला आश्वासन देतो की, लवकरच तिलाही परदेशात घेऊन जाईल आणि तिला सर्व सुखसोयी उपलब्ध करून देईल. अशा प्रकारे लोकसंगीत आणि आधुनिक रॅपच्या जुगलबंदीमुळे हे गाणे अधिक प्रभावी आणि वेगळे ठरते.
डिजिटल प्लॅटफॉर्मवर दमदार छाप
‘स्वामी परदेश’ला मिळालेले 1.47 कोटींहून अधिक व्ह्यूज हे उत्तराखंडच्या लोकसंगीताच्या वाढत्या लोकप्रियतेचे प्रतीक मानले जात आहे. आधुनिक प्रयोग आणि दर्जेदार सादरीकरणामुळे हे संगीत आता जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असून, डिजिटल प्लॅटफॉर्मवरही उत्तराखंडच्या सांस्कृतिक वारशाची दमदार छाप उमटत आहे.