अमिताभ बच्चन धमकीवरुन गँगस्टर गोल्डी ढिल्लों आणि लॉरेन्स बिश्नोई गँगमध्ये सोशल मीडियावर चांगलीच जुंपली

गँगस्टर गोल्डी ढिल्लों आणि लॉरेन्स बिश्नोई गँगमध्ये वर्चस्वाचा संघर्ष चर्चेत आला असून बॉलिवूडमधील दोन कलाकारांना दिलेल्या धमक्यांमुळे सुरक्षा यंत्रणांसमोरही प्रश्न निर्माण झाले आहेत.

अमिताभ बच्चन धमकीवरुन गँगस्टर गोल्डी ढिल्लों आणि लॉरेन्स बिश्नोई गँगमध्ये सोशल मीडियावर चांगलीच जुंपली
Gangster Goldy Dhillon Gives Death Threat To Amitabh Bachchan
| Updated on: Nov 16, 2026 | 11:04 PM

 

बॉलीवूड स्टार अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना गँगस्टर गोल्डी ढिल्लों याने धमकी दिली आहे. बुलेट प्रुफ काचा तुम्हाला वाचवू शकणार नाही. तुम्हाला बुलेट प्रुफ काचा असतानाही ठार मारण्यात येईल अशी धमकी गोल्डी ढिल्लों याने दिली आहे. गोल्डी ढिल्लों याने केलेल्या पोस्टमध्ये मुंबईत आपले २०० साथीदार तयार असल्याचा दावा केला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने विकास ठाकूर आणि दीपक सिंह यांना अटक केल्याने कोणताही कट थांबलेला नाही, असेही त्याने म्हटले होते. १९८४ च्या शीखविरोधी दंगलींचा बदला घेण्याचा उल्लेख करत या दोघांना लक्ष्य करण्याची भाषा या पोस्टमध्ये गोल्डी ढिल्लों याने केली होती.

Loading...

आता गँगस्टर गोल्डी ढिल्लों याच्या पोस्टला आता लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या मुन्ना ब्रॅम्प्टन याने सोशल मीडियावर प्रत्युत्तर दिले आहे. मुन्ना ब्रॅम्प्टन आणि मंदीप स्पेन यांच्या नावाने करण्यात आलेल्या पोस्टमध्ये गोल्डी ढिल्लोंवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.गोल्डी ढिल्लों हा गुन्हेगार नसून प्रसिद्धी मिळवण्यासाठी धमक्या देत असल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. पंजाबमध्ये अमली पदार्थांची विक्री आणि केबल चोरीच्या प्रकरणांत त्याच्याविरोधात गुन्हे दाखल असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.गोल्डी ढिल्लोंला कॅनडामध्ये तीन हत्या आणि २० ते २५ गोळीबाराच्या घटनांनंतर आपण साथ दिल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. जानेवारी २०२६ मध्ये जर्मनीत गोल्डी ढिल्लोंवर हल्ला झाल्याचा उल्लेख करत त्याच्या शौर्याच्या दाव्यांवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर कोणत्याही देशात समोरासमोर येण्याचे आव्हान देत पोस्टमध्ये गोळ्या घालण्याची धमकीही देण्यात आली आहे.

दरम्यान, गोल्डी ढिल्लोंने आधी सोशल मीडियावर पोस्ट करत आपले मुंबईत २०० साथीदार तयार असल्याचा दावा केला होता. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने विकास ठाकूर आणि दीपक सिंह यांना अटक केल्याने कोणताही कट थांबलेला नाही, असेही त्याने म्हटले होते. या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात पोस्ट केल्याने गँगस्टर गोल्डी ढिल्लों आणि लॉरेन्स बिश्नोई गँगमध्ये सोशल मीडियावर चांगलाच वाद सुरु झाला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us