Tiger Shroff : टायगर श्रॉफ केसमध्ये नवा ट्विस्ट, प्रेमाचा अँगल समोर, आरोपी राधा-कुणालने…नवी माहिती समोर!
टायगर श्रॉफच्या गाडीवर 18 ऑक्टोबर 2026 रोजी जुहू परिसरातील एका पार्कजवळ गोळीबार झाला. गोळीबार करताना एकूण तिघेजण होते. दोघांनी गाडीवर गोळीबार केला तर एक जण दुचाकी चालवत होता.

Tiger Shroff Case : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईत गोळीबार झाला. या गोळीबारात त्याच्या कारचा चालक तसेच दुसरा पादचारी जखमी झाला. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या घटनेने मुंबई तसेच राज्यात एकच खळबळ उडालीय. बॉलिवुडमध्येही वेगळी चिंता व्यक्त केली जातेय. या प्रकरणात संशयित आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्यात. त्यांची कसून चौकशी केली जातेय. दरम्यान आरोपींच्या चौकशीत धक्कादायक सत्य समोर आले आहे. या गोळीबाराच्या प्रकरणात आता प्रेमाचा अँगल समोर आलाय. आरोपी राधा आणि आरोपी कुणाल एकमेकांच्या प्रेमात असून त्यामुळेच त्यांनी या कृत्यात एकमेकांना साथ दिल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर आलंय.
राधा, बबीता आणि कुणाल नेमकं कनेक्शन काय?
समोर आलेल्या माहितीनुसार टायगरवर गोळीबार करण्यासाठी वापरलेले पिस्तुल दिल्लीतून मुंबईत आणण्यात आले होते. हे पिस्तुल राधाने मुंबईत आणले होते. हीच राधा आरोपी कुणालची प्रेयसी आहे. कुणालच्या सांगण्यावरूनच राधा दिल्लीतून मुंबईत पिस्तुल पुरवण्यास तयार झाली. कुणालने राधासोबत मुंबईला येण्यासाठी बबीतालाही पाठवले होते. विशेष म्हणजे मुंबईत आल्यानंतर कुणालने राधा आणि बबिताची मुंबईत एक रात्र राहण्याची व्यवस्था एका हॉटेलमध्ये केली होती.
20 ऑक्टोबर रोजी चार जणांना अटक
टायगर श्रॉफच्या गाडीवर 18 ऑक्टोबर 2026 रोजी जुहू परिसरातील एका पार्कजवळ गोळीबार झाला. गोळीबार करताना एकूण तिघेजण होते. दोघांनी गाडीवर गोळीबार केला तर एक जण दुचाकी चालवत होता. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवत 20 ऑक्टोबर रोजी चार जणांना अटक केली. 21 वर्षीय कुणाल आणि 19 वर्षीय सुमित, उत्तर प्रदेशातील 23 वर्षीय राधा आणि 23 वर्षीय बाबिता यांचा समावेश आहे.
अभिनेता सलमान खानच्याही सुरक्षेत वाढ
दुसरीकडे टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्यानंतर दुसरीकडे इतर अभिनेत्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यात अक्षय कुमारचाही समावेश आहे. अभिनेता सलमान खानच्याही सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून मुंबई पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.
