टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट! आरोपींना पोलीस कोठडी सुनावली; किल्ला कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, सुनावणीत काय घडलं?
Tiger Shroff Firing Case Accused Police Custody: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. किल्ला कोर्टाचा आरोपींबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सर्व आरोपीेना पोलीस कोठडी सुनावली आहे.

अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणी सर्व आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आले होते. यानंतर या प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी कोर्टाकडे अधिक तपासासाठी आरोपींच्या १४ दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी किल्ला कोर्टाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. १० दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. किल्ला कोर्टाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
न्यायालयात आरोपींना वकीलपत्रावर सही करण्यास नकार दिला होता. पेपर कशाचा आहे, सही का पाहिजे असा सवाल आरोपींनी केला होता. वकिलांनी समजावल्यानंतर त्यांनी सही केली आहे. आरोपीने गुन्ह्यावेळी वापरलेले मोबाईल नष्ट केलेले आहेत ते शोधायचे आहेत. गोळीबार करून आरोपी फरार झाले होते. त्यांना राजस्थानच्या कोटामधून अटक करण्यात आली आहे. ट्रँझिट रिमांड घेऊन आरोपींना मुंबईत आणण्यात आले आहे. २ मोबाईल नष्ट करण्यात आले आहेत. ते शोधायचे आहेत. गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. परराज्यात जाऊन तपास करावा लागणार आहे, असं मुंबई पोलिसांनी कोर्टात सांगितलं आहे.
लॉरेन्स बिश्नोई गॅंगचा हस्तक अनिल पंडित याच्या नावाने धमकी आली आहे. गोळीबारानंतर ऑडिओ क्लिप आलेली त्यामुळे प्रकरण मोठं आहे. यामुळे पोलिसांकडून १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले हत्यारही सापडले नाहीत. ते आरोपींनी कुठे फेकले आहे ते शोधायचे आहे, याचा तपास करण्यासाठी वेळ हवा असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. यानंतर आता सायंकाळी ५.३० वाजता मुंबई पोलीस पत्रकार परिषद घेणार आहेत. गोळीबार प्रकरणी ते माहिती देणार आहेत.
आरोपींच्या वकिलांनी सांगितलं की, ते सर्व निर्दोष आहेत. त्यांचा काहीही संबंध नाही. त्यांना ताब्यात देण्याची गरज नाही. त्यांचा कोणत्याही प्रकारच्या षडयंत्रात सहभाग नाही. पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, या तीन आरोपींव्यतिरिक्त आणखी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींवर अजामीनपात्र कलमे लावण्यात आली आहेत. शस्त्र कायदा लागू करण्यात आला आहे. शस्त्र सापडलेले नाही, आरोपींना ते शस्त्र कुठून मिळाले आणि त्यांच्याकडे आणखी काही शस्त्र आहे का, याचा तपास व्हायला हवा.
यावर सरकारी वकिलांनी सांगितले की, अटक केलेले आरोपी नोंदणीकृत गुन्हेगार आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून आणि त्यांच्या बाईकचा माग काढल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींच्या वकिलाने सांगितले की त्यांचे पक्षकार दोषी नाहीत. यात सामील असलेल्या इतर व्यक्तींची नावे आणि भूमिका निश्चित करणे देखील महत्त्वाचे आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचे वर्णन केले जात आहे, तर आरोपींना केवळ संशयावरून अटक करण्यात आली आहे.
आरोपींना आधीच ४८ तासांची पोलीस कोठडी देण्यात आली असून त्यांची रात्रभर चौकशी करण्यात आली आहे. ट्रान्झिट रिमांडही मंजूर करण्यात आला आहे. पोलिसांनी महत्त्वपूर्ण जप्ती केली आहे. दिल्लीत दोन महिला आणि दोन पुरुषांना, तसेच गुजरात आणि हरियाणात प्रत्येकी एकाला अटक करण्यात आली आहे. याचा अर्थ, या तीन आरोपींशी संबंधित प्रकरणात एकूण सहा इतर व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, आरोपीच्या वकिलाने पुढील पोलीस कोठडी देण्यास विरोध केला आणि आरोपीला न्यायालयीन कोठडीत (मॅजिस्ट्रेटच्या कोठडीत) पाठवण्याची मागणी केली.
