AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार परिणीती चोप्रा,‘रिपोर्टिंग लाइव’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता, या दिवशी होणार प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राच्या रिपोर्टिंग लाइवचा थरारक ट्रेलर रिलीज. अभिनेत्री पत्रकाराच्या भूमिकेत. चित्रपटाची कथा पाहून चाहत्यांना लागली चित्रपटाची उत्सुकता. कधी प्रदर्शित होणार?

पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार परिणीती चोप्रा,‘रिपोर्टिंग लाइव’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता, या दिवशी होणार प्रदर्शित
| Updated on: Oct 03, 2026 | 4:15 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकरच एका वेगळ्या आणि दमदार भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या आगामी ‘रिपोर्टिंग लाइव’ या थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर शनिवारी प्रदर्शित करण्यात आला. अवैध वाळू उत्खनन आणि त्यामागे असलेल्या वाळू माफियाच्या धोकादायक नेटवर्कवर आधारित हा चित्रपट असल्याचे ट्रेलरमधून पाहायला मिळते. चित्रपटात परिणीती पहिल्यांदाच पत्रकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे.

‘रिपोर्टिंग लाइव’चा 2 मिनिटे 2 सेकंदांचा ट्रेलर एका अशा जगाची झलक दाखवतो, जिथे अवैध वाळू उत्खननाचा काळा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या धंद्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी हा मार्ग किती धोकादायक ठरू शकतो हे ट्रेलरमधील घटनांमधून दिसून येते.

एका जीवघेण्या अपघातानंतर महत्त्वाकांक्षी फील्ड रिपोर्टर आणि कॅमेरामन या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात करतात. परिणीती चोप्राने रिपोर्टरची भूमिका साकारली असून देवेन भोजानी कॅमेरामनच्या भूमिकेत दिसणार आहे. दोघेही या प्रकरणाशी संबंधित असे काही प्रश्न उपस्थित करतात, ज्यांची उत्तरं प्रभावशाली लोकांना द्यायची नसतात.

प्रत्येक सुरागासोबत वाढतो धोका

रिपोर्टर आणि कॅमेरामन या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात तसतशी त्यांच्यासमोरील आव्हानं वाढत जातात. प्रत्येक उत्तरामागे एक नवा प्रश्न आणि प्रत्येक सुरागासोबत एक नवा धोका त्यांच्यासमोर उभा राहतो. त्यामुळे सत्य शोधण्याची त्यांची मोहीम हळूहळू जीवघेणी बनत जाते.

वाळू माफियाच्या या धोकादायक नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी दोघांना कोणत्या परिस्थितींना सामोरं जावं लागतं, याची उत्सुकता ट्रेलरमुळे निर्माण झाली आहे.

9 ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित

‘रिपोर्टिंग लाइव’ची निर्मिती पार्थ किरण ठाकुर आणि जोशुआ शिरसाट यांनी केली आहे. अवैध वाळू उत्खनन, माफियाचे नेटवर्क, पत्रकारिता आणि सत्याचा शोध या सगळ्यांचा थरारक मेळ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

‘रिपोर्टिंग लाइव’ हा चित्रपट 9 ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. परिणीती चोप्राचा पत्रकाराच्या भूमिकेतील हा नवा अंदाज आणि वाळू माफियाच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी थरारक कथा प्रेक्षकांचे किती लक्ष वेधून घेते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Follow Us
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
Video : पुण्यात मनसेचं गुटखा माफियाविरोधात तीव्र आंदोलन
Video : पुण्यात मनसेचं गुटखा माफियाविरोधात तीव्र आंदोलन, पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह