AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिला घरी ठेवलं पाहिजे..; विजयसोबत अफेअरच्या चर्चांदरम्यान त्रिशाबद्दल अभिनेत्याची आक्षेपार्ह टिप्पणी, भडकून म्हणाली ‘मूर्खपणाला..’

थलपती विजयसोबत अफेअरच्या चर्चांदरम्यान अभिनेत्री त्रिशा कृष्णनबद्दल एका अभिनेत्याने भर कार्यक्रमात आक्षेपार्ह टिप्पणी केली. या टिप्पणीनंतर त्रिशाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चांगलाच समाचार घेतला आहे.

हिला घरी ठेवलं पाहिजे..; विजयसोबत अफेअरच्या चर्चांदरम्यान त्रिशाबद्दल अभिनेत्याची आक्षेपार्ह टिप्पणी, भडकून म्हणाली 'मूर्खपणाला..'
Thalapathy Vijay and Trisha KrishnanImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 09, 2026 | 8:39 AM
Share

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेता थलपती विजयच्या पत्नीने घटस्फोटाचा अर्ज दाखल करत त्याच्यावर विवाहबाह्य संबंधाचा आरोप केल्यानंतर त्रिशाच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली. या चर्चांदरम्यान त्रिशा आणि विजय एका लग्नसोहळ्यात एकत्र उपस्थित राहिले. या दोघांच्या या उपस्थितीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच चित्रपट निर्माता आणि अभिनेता आर. पार्थिवनने दोन वेगवेगळ्या प्रसंगी परिस्थितीबद्दल भाष्य केलं. त्यानंतर आता त्रिशाने तिच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित चांगलाच समाचार घेतला आहे.

त्रिशाची पोस्ट-

‘अलिकडे एका कार्यक्रमाच्या आयोजकांनी मला कळवलं की माझं नाव आणि फोटो शेवटच्या क्षणी एका व्यक्तीच्या विनंतीवरून समाविष्ट करण्यात आला आहे, ज्याने त्याच्या सहाय्यकाद्वारे कळवलं होतं. मायक्रोफोन एखाद्या टिप्पणीला बुद्धिमान किंवा विनोदी बनवत नाही. तो फक्त मूर्खपणाला अधिक अधोरेखित करतो. ज्ञानाशिवाय असभ्य शब्द हे ज्या व्यक्तीला उद्देशून म्हटले आहेत, त्या व्यक्तीपेक्षा बोलणाऱ्याबद्दल अधिक सांगतात’, अशा शब्दांत तिने कोणाचंही नाव न घेता टोला लगावला आहे. गलाट्टा पुरस्कार सोहळ्यादरम्यान पार्थिवनने केलेल्या टिप्पणीनंतर त्रिशाची ही प्रतिक्रिया समोर आली आहे.

या पुरस्कार सोहळ्यात पार्थिवनला त्याने ज्या कलाकारांसोबत काम केलं होतं, त्यांच्याबद्दल बोलण्यास सांगण्यात आलं होतं. जेव्हा त्रिशाचा फोटो समोर आला तेव्हा त्याने कुंदवाईच्या भूमिकेचा संदर्भ देत एक टिप्पणी केली आणि म्हणाला, “ही कुंदवाई काही दिवसांसाठी घरी ठेवली पाहिजे. चांगलं आहे, तिला बाहेर येऊ देऊ नका.”

थलपती विजयवर पत्नी संगीताने विवाहबाह्य संबंधाचा आरोप करत कोर्टात घटस्फोटासाठी याचिका केली होती. त्यानंतर काही दिवसांतच विजय ‘एजीएस’ या चित्रपटाचे निर्माते कलपथी सुरेश यांच्या मुलाच्या रिसेप्शनमध्ये अभिनेत्री त्रिशा कृष्णनसोबत येऊन सर्वांचं लक्ष वेधलं. या रिसेप्शन पार्टीमध्ये विजय आणि त्रिशाला एकत्र पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. कारण पत्नी संगीताने एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे आरोप केल्यानंतर सोशल मीडियावर विजय आणि त्रिशा यांचीच सर्वाधिक चर्चा होती. रिसेप्शनमध्ये विजय आणि त्रिशा एकत्रच पोहोचले होते. यावेळी विजयच्या हातात पुष्पगुच्छ होतं, तर त्रिशा इतर पाहुण्यांची गळाभेट घेताना आणि हस्तांदोलन करताना दिसली.

Follow Us
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा