
Actress Hina Khan Cancer: टीव्ही विश्वातील प्रसिद्घ आणि लोकप्रिय अभिनेत्री हिना खान हिला काही दिवसांपूर्वी कॅन्सर झाल्याचं कळलं आहे. अभिनेत्री ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती समोर आली आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. सध्या अभिनेत्री उपचार सुरु आहे. उपचार सुरु असताना हीना खान हिने बॉयफ्रेंड रॉकी जैस्वाल याच्यासोबत लग्न देखील केलं आहे. दरम्यान, अभिनेत्रीने उपचारासाठी किती खर्च आला याबद्दल देखील सांगितलं आहे. सध्या सर्वत्र हीना खान हिची चर्चा सुरु आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत हीना खान म्हणाली, ‘मी अंबानी तर नाहीये. माझ्याकडे गडगंज पैसा आहे… असं देखील नाही. देव प्रचंड दयाळू आहे. मा प्रामाणिकपणे पैसा कमावला आहे. मी असं म्हणू शकते की मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र महिला आहे. पण कॅन्सर उपचारांचा खर्च हा प्रत्येकासाठी एक समस्या आहे. मी एक अभिनेत्री आहे, आणि कदाचित कोणीतरी माझ्यापेक्षा जास्त कमाई करणारा असेल.’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जर तुम्हाला भविष्याची थोडीशी जाणीव असेल तर तुम्ही त्यानुसार गुंतवणूक करा. पण कॅन्सरसारख्या आजारासाठी तुम्हाला दरमहा उपचारांसाठी जावं लागतं आणि इथं सगळं बदलतं. मी ज्या माध्यमातून आली आहे, तिथे तुमचं चांगलं दिसणं खूप महत्त्वाचं आहे.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
हिना खान मोठ्या धैर्याने कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढत आहे. ती सोशल मीडियावर त्याबद्दल अपडेट्स देत राहते. कॅन्सरमुळे हिनाने तिचं काम सोडलेलं नाही. ती सतत काम करत आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.
गेल्या अनेक वर्षांपासून हिना खान बॉयफ्रेंड रॉकी याला डेट करत होती. हिनाच्या कठिण काळात देखील रॉकीने अभिनेत्रीची साथ सोडली नाही. नुकताच दोघांनी लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान हीट झाले. आता लवकरच दोघे एका रिऍलिटी शोच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत.