डबल आनंद ! गौतम रोडेच्या घरी पाच वर्षांनी गुड न्यूज ! पत्नी पंखुडीने दिला जुळ्या बाळांना जन्म..

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कपल गौतम रोडे आणि पंखुडी अवस्थी यांच्या घरी डबल आनंदाचे वातावरण आहे. पंखुडीने जुळ्या बाळांना जन्म दिला असून सोशल मीडियावर ही खुशखबरी शेअर केली आहे.

डबल आनंद ! गौतम रोडेच्या घरी पाच वर्षांनी गुड न्यूज ! पत्नी पंखुडीने दिला जुळ्या बाळांना जन्म..
Image Credit source: instagram
| Updated on: Jul 26, 2023 | 1:46 PM

गौतम रोडे आणि पंखुडी अवस्थी हे दोघेही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध जोडपं आहेत. त्यांच्या घरात सध्या डबल आनंदाचं वातावरण आहे. गौतम (Gautam Rode) आणि पंखुडी (Pankhuri Awasthi) आई-बाबा बनले आहेत. पंखुडीने जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. खुद्द गौतम आणि पंखुडी या दोघांनी सोशल मीडियावरून त्यांच्या चाहत्यांसाठी ही गुड न्यूज शेअर केली आहे.

काही महिन्यांपूर्वीच या दोघांनी त्यांच्याकडे गुड न्यूज असल्याचे सांगितले होते. तर आज गौतम आणि पंखुडीने इन्स्टाग्रामवर त्यांच्या बाळांच्या आगमनाची आणखी एक गुड न्यूज शेअर केली आहे. 25 जुलै रोजी पंखुडीने एक गोंडस मुलगा आणि एका क्युट मुलील जन्म दिला. एक क्युटशा पोस्टद्वारे दोघांनीही सोशल मीडियावर ही खुशखबरी शेअर केली आहे.

 

या बातमीमुळे गौतम व पंखुडीचा आनंद द्विगुणित झाला आहे. लग्नाच्या पाच वर्षांनंतर दोघेही मात-पिता बनले आहेत. आता त्यांच्या घरात केवळ एकच नव्हे तर दोन छोटे पाहुणे आले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. आता हे जोडपे आई-वडील झाल्यामुळे टीव्ही स्टार्ससह या जोडप्याचे चाहतेही त्यांचे अभिनंदन करत आहेत.

 

पंखुडीने 25 जुलै 2023 ला बाळांना जन्म दिला. मात्र गौतम आणि पंखुडीने एका दिवसानंतर ही खुशखबरी सर्वांसोबत शेअर केली आहे. Twice Blessed अशा कॅप्शनसह त्यांनी पोस्ट शेअर केली आहे. सर्वांनी दिलेले प्रेम आणि आशीर्वादाबद्दल त्यांनी आभारही मानले आहेत.

 

नवीन पालक बनलेल्या या जोडप्याचे टीव्ही स्टार्सनीही कमेंट्सद्वारे अभिनंदन केले आहे. आमिर अलीने , कॉमेडी क्वीन भारती सिंग, दिव्यांका त्रिपाठी दहिया, मौली गांगुली यांसह अनेक सेलिब्रिटींनी त्यांचे अभिनंदन केले असून चाहत्यांनीही या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.