सेटवर त्यांचा दबदबा, मला चिमटे काढायचे अन्…मराठी अभिनेत्यानं सांगितला अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव

Uday Tikekar On Ashok Saraf And Laxmikant Berde : उदय टिकेकर यांनी एका मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

सेटवर त्यांचा दबदबा, मला चिमटे काढायचे अन्...मराठी अभिनेत्यानं सांगितला अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव
| Updated on: Nov 05, 2026 | 5:22 PM

दिग्गज मराठी अभिनेते उदय टिकेकर यांनी अनेक मराठी गाजलेल्या मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. ते सध्या ‘महाराष्ट्र एप्सटिन फाईल्स‘ या सिनेमामुळे चर्चेत आहेत. उदय यांनी अनेक मोठ–मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत उदय यांनी लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. ‘शुभमंगल सावधान‘ सिनेमाच्या सेटवर लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ त्यांना मुद्दाम सतवायचे, असं उदय टिकेकर यांनी सांगितलं.

उदय टिकेकर यांनी सांगितला किस्सा

Loading...

उदय टिकेकर म्हणाले की, ‘सिनेमाच्या प्रवासाबद्दल सांगायचं झाल्यास, नाटक करत असताना मला एकदा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा फोन आला होता. मला म्हणाले की, ‘या व्यक्तीला जाऊन भेट. त्यांच्याकडे मी तुझं नाव सुचवलं आहे. या सिनेमात तू हिरो म्हणून काम करणार आहेस’ डायरेक्ट असं मला त्यांनी सांगितलं. माझी कधीही त्यांची समोरासमोर भेट किंवा ओळख नाही. लक्ष्मीकांत बेर्डे तेव्हा खूप मोठे स्टार होते. मला डायरेक्ट फोन आला, मी वेडाच झालो. पहिली फिल्म माझी ‘धाकटी सून’. त्यानंतर मला हिंदी फिल्म मिळाली, ‘काफिला’. हा सिनेमा जास्त बॉक्स ऑफिसवर चालला नाही, पण चित्रपट छान आहे. यानंतर प्रवास सुरु झाला.’

उदय पुढे म्हणाले की, ”शुभमंगल सावधान’ हा माझा त्या दोघांसोबतचा एकत्र केलेला पहिला सिनेमा होता. त्यांचा सेटवर दबदबा असायचा. अशोक मामा आणि लक्ष्मीकांत बेर्डे खूप सतवायचे. माझ्यासाठी सिनिअर होते. त्या काळी खूप मोठे स्टार होते. खतरनाक होते. उगाचच खोटं-खोटं मारायचे, चिमटे काढायचे. काहीतरी बोलत राहायचे, मला मारताना, पण मजा यायची. ‘शुभमंगल’ हा सिनेमा प्रचंड गाजला. लोक या सिनेमाविषयी कौतुक करायचे.’ ‘अभिजात मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत उदय टिकेकर बोलत होते.

 

दरम्यान, उदय टिकेकर यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यांनी ‘सत्वपरीक्षा‘, ‘सिम्बा‘, ‘सूर्यवंशी‘, ‘बर्फी‘, ‘गोलमाल अगेन‘, ‘अंतिम‘, ‘मदारी‘, ‘लय भारी‘, ‘सतरंगी रे‘  यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us