AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

15 किलोचे दागिने, 5 किलोचा लहंगा, या गाण्यात अभिनेत्रीला झालेल्या प्रचंड जखमा, गाणं ठरलेलं प्रचंड सुपरहिट

15 किलोचे दागिने, 5 किलोचा लहंगा, 90 च्या दशकातील हे गाणं शूट करताना अभिनेत्रीला झाल्या होत्या प्रचंड जखमा. परदेशातील लोकांनी गाण्यावर केलेली पैशांची उधळण. गाणं ठरलेलं प्रचंड सुपरहिट.

15 किलोचे दागिने, 5 किलोचा लहंगा, या गाण्यात अभिनेत्रीला झालेल्या प्रचंड जखमा, गाणं ठरलेलं प्रचंड सुपरहिट
Urmila MatondkarImage Credit source: Social media
| Updated on: Sep 26, 2026 | 1:38 PM
Share

90च्या दशकातील गाणी आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. या काळातील अनेक गाणी आजही पार्ट्या, लग्नसमारंभ आणि महफिलींमध्ये तितक्याच उत्साहाने वाजवली जातात. असंच एक आयकॉनिक गाणं म्हणजे अभिनेत्री उर्मिला मातोंडकरवर चित्रित झालेलं ‘छम्मा छम्मा’. 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या चायना गेट या चित्रपटातील हे गाणं रिलीज होताच प्रचंड लोकप्रिय झालं.

या गाण्याची लोकप्रियता इतकी मोठी होती की, नंतर त्याचा वापर हॉलिवूडच्या मौलिन रूज! या चित्रपटातही करण्यात आला. तसेच 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या फ्रॉड सैय्यां या चित्रपटासाठी ‘छम्मा छम्मा’चं मॉडर्न व्हर्जन तयार करण्यात आलं होतं. नेहा कक्कडने हे गाणं गायलं होतं.

15 किलो दागिने आणि 5 किलोचा लहंगा

‘छम्मा छम्मा’च्या शूटिंगदरम्यान उर्मिला मातोंडकर यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. गाण्यातील बंजारण लूकसाठी त्यांनी तब्बल 5 किलो वजनाचा लहंगा आणि जवळपास 15 किलो वजनाचे दागिने परिधान केले होते. एवढं वजन अंगावर घेऊन त्यांनी गाण्यातील कठीण डान्स स्टेप्स सादर केल्या.

एका जुन्या सारेगामापा कार्यक्रमात उर्मिला मातोंडकरने या गाण्याशी संबंधित आठवणी सांगितल्या होत्या. कार्यक्रमात एका स्पर्धकाने ‘छम्मा छम्मा’ सादर केल्यानंतर उर्मिलाने गाण्याच्या शूटिंगच्या दिवसांची आठवण झाली. त्यावेळी त्यांनी या गाण्याच्या शूटिंगदरम्यान आलेला अनुभव सांगितला.

उर्मिलाच्या नृत्याचं भरभरून कौतुक

उर्मिलाने सांगितलं की, गाण्याच्या सुरुवातीच्या स्टेपमध्ये त्यांना साइड लूक द्यायचा होता. मात्र तिने पहिलीच स्टेप करताच तिच्या कानातील मोठ्या झुमक्याने कानाला जोरदार धक्का दिला. एवढंच नाही तर शूटिंग पूर्ण होईपर्यंत जड दागिन्यांमुळे तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी ओरखडे आणि खुणा पडल्या होत्या.

गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली असली आणि प्रेक्षकांनी उर्मिलाच्या नृत्याचं भरभरून कौतुक केलं असलं तरी या गाण्याचा अनुभव अभिनेत्रींसाठी शारीरिकदृष्ट्या खूपच त्रासदायक ठरला होता.

परदेशातही झाली गाण्याची जोरदार चर्चा

उर्मिलाने याच कार्यक्रमात आणखी एक मजेशीर किस्सा सांगितला होता. तिच्या एका मित्राने न्यूयॉर्कहून फोन करून सांगितलं की, संपूर्ण चित्रपटादरम्यान प्रेक्षक शांत होते; मात्र ‘छम्मा छम्मा’ गाणं सुरू होताच भारतीयांसोबतच तिथल्या इतर लोकांनीही उत्साहाने पैसे उधळायला सुरुवात केली.

Follow Us
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार