उर्वशी रौतेलाचा बेडरुममधील Video व्हायरल, तिच्यासोबत दिसणारा तो व्यक्ती कोण?

अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा बेडरुममधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओमधील व्यक्ती कोण? असा देखील सवाल चाहते करत आहेत.

उर्वशी रौतेलाचा बेडरुममधील Video व्हायरल, तिच्यासोबत दिसणारा तो व्यक्ती कोण?
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 22, 2026 | 3:04 PM

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिचे ग्लॅमरस फोटो, व्हिडीओ आणि तिच्याशी संबंधित विविध अपडेट्स चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. आता पुन्हा एकदा उर्वशी एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. नुकताच उर्वशीचा बेडरुममधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये उर्वशी बेडवर बसलेली दिसत असून तिच्यासोबत आणखी एक व्यक्ती असल्याचे दिसून येत आहे. दोघेही एकमेकांसोबत रोमँटिक अंदाजात दिसत असल्याने या व्हिडीओने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या व्हिडीओमधील तो व्यक्ती कोण आहे आणि हा व्हिडीओ चित्रपटातील आहे की इतर कोणत्या प्रोजेक्टमधील आहे यावरून देखील सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडिया पापाराझी अकाउंट Viral Bhayani यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओ समोर येताच काही वेळातच तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. चाहत्यांनी या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया देत लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

उर्वशी रौतेला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती आपल्या फोटोशूट्स आणि वैयक्तिक आयुष्यातील काही झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्यामुळे तिच्याशी संबंधित कोणतीही पोस्ट किंवा व्हिडीओ समोर आला की चाहत्यांमध्ये त्याची चर्चा सुरू होते.

दरम्यान, व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या प्रसंगाबाबत किंवा सोबत असलेल्या व्यक्तीबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर या व्हिडीओची चर्चा रंगत असली तरी त्यामागील नेमकं सत्य काय आहे, हे स्पष्ट झालेलं नाही.

काही दिवसांपूर्वी सापडली वादात

उर्वशी रौतेला सध्या एका गाऊनमुळे चर्चेत आली आहे. जयपूर येथे झालेल्या ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’च्या ग्रँड फिनालेमध्ये उर्वशीने तिरंग्यापासून प्रेरित गाऊन परिधान केला होता. या पोशाखावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्यानंतर आता हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे.

23 ऑगस्ट रोजी जयपूरमध्ये ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026 ’चा ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उर्वशी रौतेला परीक्षक म्हणून सहभागी झाली होती. यावेळी तिने केशरी, पांढरा आणि हिरवा रंग असलेला फ्लोअर-लेंथ गाऊन परिधान केला होता. गाऊनच्या मध्यभागी अशोक चक्रापासून प्रेरित डिझाइनही पाहायला मिळत होते. या पोशाखावर काही सोशल मीडिया युजर्सनी आक्षेप घेतला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us