वयाच्या 34व्या वर्षी सिंगल आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री; लग्नाबद्दल म्हणाली, मी अनेकदा प्रेमात पडलेय, लहानपणापासून..

Marathi Actress : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री वयाच्या 34व्या वर्षी सिंगल असून तिनं लग्नाबद्दल भाष्य केलं आहे.

| Updated on: Nov 02, 2026 | 9:55 PM
1 / 5
मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामीचं वय 34 वर्ष असून अद्याप अभिनेत्रीनं लग्न केलेलं नाही. वैदेहीनं नुकत्याच एका मुलाखतीत लग्नाबद्दल भाष्य केलं आहे.

मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामीचं वय 34 वर्ष असून अद्याप अभिनेत्रीनं लग्न केलेलं नाही. वैदेहीनं नुकत्याच एका मुलाखतीत लग्नाबद्दल भाष्य केलं आहे.

2 / 5

वैदेही म्हणाली की, 'मी अनेकदा प्रेमात पडली आहे. मला लग्नही करण्याची इच्छा आहे. लोकांना विश्वास बसत नाही, पण मी 'जब वी मेट'मधली गीत आहे. मला लहानपणापासूच लग्न करायची इच्छा होती. फक्त ते काही कारणानं अजून होऊ शकलेलं नाही. आजही मला कोणी विचारलं की लग्न करायचंय का? तर हो, पण ती योग्य व्यक्ती समोर आल्याशिवाय नाही. ती व्यक्ती अजून समोर आलेली नाही.'

3 / 5

'जर ती व्यक्ती आली असती तर ती जगाला १०० टक्के कळली असती. मला काही गोष्टी खाजगी ठेवायला आवडतात. पण, ही गोष्ट नक्कीच मी जगाला सांगितली असती. मी अजूनही मॅनिफेस्ट करत आहे. आता बघूया नशिबात जे असेल ते होईल.'

4 / 5

'माझा मॅनिफेस्टेशनवर विश्वास आहे. जे नशिबात आहे ते मिळतं यावरही माझा १०० टक्के विश्वास आहे. पण, जर मी ते मॅनिफेस्ट केलं, तर मी कदाचित त्या सकारात्मकतेनं ते किमान जवळ तरी आणू शकेल. जर ते नशिबातच नसेल तर नाहीच मिळणार.'

5 / 5

'हा अनुभव मी आयुष्यात घेतला आहे. मी २०२४ ला मॅनिफेस्ट केलं होतं की, माझं एक दिवस प्रोडक्शन हाऊस असेल. आता २०२६ मध्ये जेव्हा मी ते वाचलं तेव्हा टचकन माझ्याच डोळ्यात पाणी आलं.' असं वैदेही म्हणाली. 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत वैदेही बोलत होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us