AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोट्यवधींची संपत्ती, आलिशान घरं आणि लक्झरी कार्स, वासू भगनानी की रकुल प्रीत सिंह; दोघांमध्ये श्रीमंत कोण ?

आयकर विभागाच्या धाडीनंतर वासू भगनानी आणि रकुल प्रीत सिंह यांच्या अफाट संपत्तीबद्दल चर्चा सुरू झाली आहे, सासरे की सूनबाई, जास्त श्रीमंत कोण ?

कोट्यवधींची संपत्ती, आलिशान घरं आणि लक्झरी कार्स, वासू भगनानी की रकुल प्रीत सिंह;  दोघांमध्ये श्रीमंत कोण ?
| Updated on: Sep 28, 2026 | 7:04 PM
Share

चित्रपटसृष्टीशी संबंधित आर्थिक व्यवहार, करातील अनियमितता आणि कथित मनी ट्रेलच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाच्या कारवाईच्या बातम्या समोर आल्यावर बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ माजली. या आरोपांप्रकरणी आयकर विभागाने रकुल प्रीत सिंह, जॅकी भगनानी, वासू भगनानी आणि पॅनोरमा स्टुडिओजच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले. संपूर्ण प्रकरणात अनेक प्रॉडक्शन हाऊसेस आणि सेलिब्रिटींची नावे समोर आली, मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये विशेष लक्ष वेधून घेतले ते वासू भगनानी आणि रकुल प्रीत सिंह यांच्या नात्याने. एकीकडे बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक दशकांपासून सक्रिय असलेले दिग्गज निर्माता वासू भगनानी, तर दुसरीकडे आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी तसेच दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह. याच पार्श्वभूमीवर हे दोघे किती श्रीमंत आहे, त्यांची संपत्ती किती, ते जाणून घेऊया.

वासू भगनानी यांचं नेटवर्थ

‘पूजा एंटरटेनमेंट’ चे सर्वेसर्वा वासु भगनानी यांटं नाव बॉलिवूडच्या प्रसिद्ध निर्मात्यांमध्ये घेतलं जातं. ‘कुली नं. 1’, ‘बीवी नं. 1’ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांपासून ते मोठ्या बजेटच्या अलीकडील प्रकल्पांपर्यंत त्यांनी चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ काम केलं आहे. त्यांनी एक मोठं साम्राज्य उभं केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वासू भगनानी यांची अंदाजे संपत्ती सुमारे 2,500 कोटी रुपये असल्याचे सांगितलं जातं. मात्र, अशा सेलिब्रिटी नेटवर्थचे आकडे अधिकृतपणे जाहीर केलेले नसतात, त्यामुळे हे आकडे अंदाजावर आधारित मानले जातात.

त्यांच्या संपत्तीमध्ये रिअल इस्टेट आणि इतर गुंतवणुकींचा समावेश असल्याचं विविध रिपोर्ट्समध्ये नमूद करण्यात आले आहे. मुंबईतील वांद्रे परिसरातील आलिशान घर तसेच महागड्या लक्झरी कार्समुळेही त्यांची जीवनशैली अनेकदा चर्चेत राहिली आहे. लॅम्बॉर्गिनी, पोर्शे आणि मर्सिडीज-मेबॅक सारख्या अनेक गाड्या त्यांच्या ताफ्यात आहेत.

सून रकुलही  कोट्यवधींची मालकीण

दुसरीकडे, त्यांची सून रकुल प्रीत सिंगनेही तिच्या मेहनतीच्या जोरावर साऊथ फिल्म्सपासून ते बॉलिवूडपर्यंत स्वत:ची ओळख निर्माण केली. 2009 साली तिने अभिनय कारकिर्दीची सुरुवा केली. त्यानंतर तिने तेलुगू, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, रकुल प्रीत सिंह हिचं अंदाजे नेटवर्थ 49 ते 50 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितलं जातं. अभिनयासोबतच ब्रँड एंडोर्समेंट्स आणि व्यावसायिक उपक्रमांमधूनही तिला उत्पन्न मिळतं. तसेच फिटनेस क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक उपक्रमांमध्येही ती सहभागी असते. ‘F45’ नावाच्या फिटनेस स्टुडिओ चेनची ती सह-मालक आहे.

संपत्तीबाबत सांगायचं झालं तर मुंबईमध्ये तिचा आलिशान फ्लॅट आहे. तसेच हैदराबादच्या जुबली हिल्ससारख्या व्हीआयपी परिसरात तिचं आलिशान 3-BHK घरं आहे,. तिच्याकडे 3 कोटींची मर्सिडिझ-मेबॅक आणि अशा अनेक मोठ्या गाड्या आहेत.

तपास यंत्रणांच्या कारवाई आणि आर्थिक चौकशीच्या पार्श्वभूमीवर आज हे कुटुंब चर्चेत असले, तरी संपत्ती आणि ग्लॅमरच्या बाबतीत बॉलिवूडमधील ही ‘सासरे-सून’ जोडी नेहमीच इंडस्ट्रीतील श्रीमंत कुटुंबांमध्ये गणली जाते.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...