जावेद अख्तर यांचा तो टोपीवाला व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ, थेट होणार कारवाई, कोर्टापर्यंत…

जावेद अख्तर त्यांचे विचार मांडताना फार काही विचार न करता जे काही आहे, ते स्पष्टपणे बोलतात. अनेकदा त्यांच्यावर जोरदार टीका देखील होते. आता सध्या जावेद अख्तर यांचा एक हैराण करणारा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.

जावेद अख्तर यांचा तो टोपीवाला व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ, थेट होणार कारवाई, कोर्टापर्यंत...
Javed Akhtar
| Updated on: Jan 02, 2026 | 1:48 PM

प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर कायमच त्यांचे विचार स्पष्टपणे मांडताना दिसतात. बऱ्याचदा त्यांच्यावर जोरदार टीका होतानाही दिसते. त्यामध्येच जावेद अख्तर यांचा एक धक्कादायक असा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. ज्या माध्यमातून मोठा दावा केला जात आहे. हेच नाही तर आता जावेद अख्तर कट्टरपंथी झाल्याचा दावा करण्यात आला. या व्हिडीओमध्ये जावेद अख्तर यांनी टोपी घातल्याचेही दिसत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर मोठी खळबळ उडाली. जावेद अख्तर यांनी त्यांच्या डीपफेक व्हिडिओद्वारे केल्या जात असलेल्या चिथावणीखोर दाव्यांवर संताप व्यक्त केला आहे. हेच नाही तर थेट कायदेशीर कारवाई करण्याचाही त्यांनी इशारा दिला.जावेद अख्तर यांनी एक्सवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी या प्रकाराला गंभीरपणे घेतल्याचे दिसत आहे.

जावेद अख्तर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, माझा तो खोटा आणि बनावट व्हिडीओ प्रसारित केला जात आहे. ज्या व्हिडीओमध्ये मी टोपी घातलेली दाखवण्यात आली. मी टोपी घातलेला फोटो संगणकाने तयार केला आहे. तो पूर्णपणे खोटा आहे. त्यामध्ये असे सांगितले जात आहे की, मी अखेर देवापुढे शरणागती पत्करली आहे.

हा फक्त आणि फक्त मुर्खपणा आहे. मी यासर्व प्रकरणाची सायबर पोलिसांकडे तक्रार करणार आहे. माझ्याबद्दल या खोट्या बातम्या पसरवणाऱ्या व्यक्तीला जबाबदार धरून माझी प्रतिष्ठा खराब केल्याबद्दल त्याविरोधात कोर्टात जाणार आहे. जावेद अख्तर यांचा फेक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. अनेकांना हा व्हिडीओ खरा वाटला.

व्हिडीओमध्ये दावा करण्यात आला की, अखेर खुदाच्या रस्ता स्वीकारला. दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये जावेद अख्तर आणि इस्लामिक क्लॉलर मुक्ती शमाऊस नदवी यांच्यात देवाचे अस्तित्व आहे का? यावर एक चर्चा झाली होती. त्यादरम्यानचे जावेद अख्तर यांचे विचार मोडून तोडून या व्हिडीओच्या माध्यमातून डीपफेक व्हिडिओ तयार करून मांडण्यात आले. फक्त जावेद अख्तरच नाही तर अनेक बरेच कलाकार आहेत, ज्यांना या गोष्टीचा फटका बसताना दिसत आहे.