Pune Election : अर्ज गिळणाऱ्या उमेदवाराची माघार, उमेदवाराला अश्रू अनावर; एकनाथ शिंदे म्हणाले…
आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून साम दाम दंड भेद चा वापर होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत यांनीही उमेदवारांवर दबाव आणला जात असल्याचे म्हटले. कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीचे २१ नगरसेवक बिनविरोध निवडून आले, तर पुण्यात शिंदे गट आणि भाजपची युती तुटली आहे.
पुण्यातही निवडणुकीचे वातावरण तापले आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार उद्धव कांबळे यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेतली. प्रभा क्रमांक ३६ मधून त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांनी त्यांच्याच पक्षातल्या मच्छिंद्र ढवळे यांचा एबी फॉर्म गिळल्याचा आरोप होता. पुण्यात गुरुवारी झालेल्या नाराजी नाट्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट कांबळे यांची दखल घेतली. अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन शिंदेंनी कांबळे यांना दिल्यानंतर, माध्यमांशी बोलताना कांबळे यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी शिंदे हे अनाथांचे नाथ असून गोरगरीब कष्टकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाहीत अशी खात्री व्यक्त केली.
पुण्यात आणि पिंपरीमध्ये भाजपच्या विरोधात थेट लढाई असल्याचं अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये स्पष्ट केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या विरोधात लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालिका निवडणुकांसाठी अजित पवारांकडून जोरदार नियोजन सुरू असून, ते भाजपच्या कारभारावर पत्रकार परिषद घेणार आहेत. पुण्यात भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेची युती तुटली असून, शिंदे गटाची शिवसेना १२३ जागांवर तर भाजप १६५ जागांवर लढणार आहे. एकही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नसल्यामुळे पुण्यातील चित्र आता स्पष्ट झाले आहे.
अर्ज गिळणाऱ्या उमेदवाराची माघार, उमेदवाराला अश्रू अनावर; शिंदे म्हणाले
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीला ऊत
हरिभाऊ राठोड यांच्यासोबत वाद अन् व्हायरल व्हिडीओवर नार्वेकरांचा खुलासा
नाशकात हायव्होल्टेज ड्रामा, बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी कोंडलं

