AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांद्याचे भाव घसरले; उत्पादन खर्चही निघेना! शेतकरी हवालदिल

कांद्याचे भाव घसरले; उत्पादन खर्चही निघेना! शेतकरी हवालदिल

राखी राजपूत
राखी राजपूत | Updated on: Feb 24, 2026 | 11:28 AM
Share

देशांतर्गत अतिरिक्त पुरवठ्यामुळे कांद्याचे बाजारभाव 800 ते 1 हजार रुपयांपर्यंत घसरले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नाहीये. केंद्र सरकारने 1.9% निर्यात सबसिडी 50% ने कमी केल्याने निर्यातदार आणि शेतकरी संकटात आहेत. परदेशी बाजारपेठा गमावत असल्याने 10% सबसिडीची मागणी जोर धरत आहे.

लासळगाव, नाशिक: देशांतर्गत कांद्याचा अतिरिक्त पुरवठा झाल्यामुळे बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. सध्या कांद्याचे सरासरी बाजारभाव 800 ते 1 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत, ज्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाहीये. या पार्श्वभूमीवर, कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांनी केंद्राकडे 10 टक्के निर्यात सबसिडीची मागणी केली होती, जेणेकरून अधिक कांदा निर्यात होऊन शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल.

मात्र, केंद्र सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष करत, अस्तित्वात असलेल्या १.९ टक्के सबसिडीमध्ये पन्नास टक्के कपात केली आहे. त्यामुळे ही सबसिडी आता प्रति शेकडा 0.95 पैशांपर्यंत खाली आली आहे. या निर्णयामुळे कांदा निर्यातदारांना आणि शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. बांगलादेशसारख्या प्रमुख बाजारपेठा स्वयंभू झाल्याने आणि पाकिस्तान तसेच चीनकडून अरब देशांना स्वस्त कांदा मिळत असल्याने भारतीय निर्यातदारांना परदेशी बाजारपेठा गमावण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करून 10टक्के सबसिडी लागू करावी, अशी मागणी कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.

Published on: Feb 24, 2026 11:28 AM

Follow Us
CJP Protest Delhi : दिल्लीतील आंदोलनानंतर अभिजीत दिपके यांची पहिली प्रतिक्रिया समोर, पोलिसांवर गंभीर आरोप.

CJP Protest Delhi : दिल्लीतील आंदोलनानंतर अभिजीत दिपके यांची पहिली प्रतिक्रिया समोर, पोलिसांवर गंभीर आरोप

जरांगे विरुद्ध मुंडे संघर्ष पेटला! धनंजयला कसं मंत्री करतात ते बघतोच, जरांगेंचा इशारा.

जरांगे विरुद्ध मुंडे संघर्ष पेटला! धनंजयला कसं मंत्री करतात ते बघतोच, जरांगेंचा इशारा

CJP च्या निदर्शकांवर दिल्लीत लाठीमार, अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया आली, म्हणाले की….

CJP च्या निदर्शकांवर दिल्लीत लाठीमार, अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया आली, म्हणाले की…

सरकारवर दबाव टाकता येत नाही, गोंधळ घालून विरोध करणं अयोग्य, CJP च्या आंदोलनावर कंगना रनौत यांची टीका!.

सरकारवर दबाव टाकता येत नाही, गोंधळ घालून विरोध करणं अयोग्य, CJP च्या आंदोलनावर कंगना रनौत यांची टीका!

IMD weather update : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, आयएमडीचा हाय अलर्ट, गरज असेल तरच घराबाहेर पडा.

IMD weather update : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, आयएमडीचा हाय अलर्ट, गरज असेल तरच घराबाहेर पडा

CJP Delhi Protest : माझे उपोषण सुरूच राहणार, सोनम वांगचूक यांची घोषणा; सरकारकडे केली महत्त्वाची मागणी!.

CJP Delhi Protest : माझे उपोषण सुरूच राहणार, सोनम वांगचूक यांची घोषणा; सरकारकडे केली महत्त्वाची मागणी!