AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP Delhi Protest : माझे उपोषण सुरूच राहणार, सोनम वांगचूक यांची घोषणा; सरकारकडे केली महत्त्वाची मागणी!

माझ्या तरुणांना जोपर्यंत संसद भवन परिसरात खासदारांना भेटू दिले जात नाही किंवा मला रुग्णालयातच खासदारांशी भेटू दिले जात नाही तोपर्यंत माझे अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका वांगचूक यांनी जाहीर केली.

CJP Delhi Protest : माझे उपोषण सुरूच राहणार, सोनम वांगचूक यांची घोषणा; सरकारकडे केली महत्त्वाची मागणी!
sonam wangchuk delhi protestImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 20, 2026 | 7:46 PM
Share

Sonam Wangchuk Delhi Protest : दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात देशभरातील तरुण सहभागी झाली आहेत. या आंदोलनाचा आजचा 23 वा दिवस आहे. कॉकरोच जनता पार्टीने 20 जुलै रोजी थेट ‘संसद मार्च’ काढण्याचे जाहीर केले होते. तसेच तरुणांनी या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहनही केले होते. आंदोलकांनी मात्र संसदेकडे जाऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. विरोधकांनीही या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. या आंदोलनाचे नेतृत्त्व करत असलेल्या सोनम वांगचूक यांनी आपले अन्नत्याग आंदोलन सोडले आहे, असे म्हटले जात होते. परंतु आता वांगचूक यांनी माझे हे आंदोलन सुरूच राहील, असे सांगितले आहे.

माझे अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील

सोनम वांंगचूक यांच्यावर सध्या दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरुणांनी संसदेकडे कूच केल्यानंतर पोलिसांनी तरुणांवर साठीमार केला. तसेच काही ठिकाणी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. पोलिसांच्या या भूमिकेवर आक्षेप घेत माझे अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील, असे वांगचूक यांनी जाहीर केले आहे.

तरुणांच्या या भूमिकेमुळे मी खूप प्रभावित झालो

माझ्या तरुणांना जोपर्यंत संसद भवन परिसरात खासदारांना भेटू दिले जात नाही किंवा मला रुग्णालयातच खासदारांशी भेटू दिले जात नाही तोपर्यंत माझे अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील. या सरकारने केंद्रीय शिक्षणमंत्र्यांवरील जबाबदारी निश्चित करावी, अशी माझी अपेक्षा आहे. आजच्या आंदोलनात तरुणांच्या भावनांचा उद्रेक व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यात आले. पण तरीदेखील तरुणांनी शांतता कायम ठेवली. तरुणांच्या या भूमिकेमुळे खूप प्रभावित झालो आहे. तरुणांना संसदेपुढे आपले मत मांडण्याची पवानगी द्यावी. हाच यावर तोडगा असू शकतो, असेही आवाहन त्यांनी पोलीस आणि केंद्र सरकारला केले.

सरकार नेमका काय निर्णय घेणार?

दरम्यान, आता सोनम वांगचूक यांनी आपले अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवण्याची घोषणा केल्यानंतर सीजेपीचे आंदोलन आणखी पेटणार का? या आंदोलनाला पाठिंबा वाढत जाणार का? सरकार नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठऱणार आहे.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी