Eknath Shinde : अरे मला कोपऱ्यात कोणी टाकलं? भाषण संपताच एकनाथ शिंदे कडाडले, थेट मंचावरच…
दसरा मेळाव्यातील भाषण संपताच एकनाथ शिंदेंनी संताप व्यक्त केला. स्टेजवरील एका चुकीने त्यांनी एकनाथ शिंदे यांनी आयोजकांना चांगलंच झापलं.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या मंचावरून विरोधकांवर टीकेचे बाण मारले. महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री बनलेले उबाठा खरे व्होट दरोडेखोर आहेत, असा शब्दात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमधील दसरा मेळाव्यातून विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. दसरा मेळाव्यातील भाषण संपल्यानंतर एकनाथ शिंदेंनी आयोजकांवर देखील संताप व्यक्त केला. अरे मला कोपऱ्यात कोणी टाकलं, असं म्हणत भर मंचावरूनच एकनाथ शिंदे आयोजकावर भडकले.
शिंदे का भडकले?
दसरा मेळावाच्या सभेत एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना मदत पाठवत असल्याचा उल्लेख केला. आम्ही फक्त भाषण देणारे नाही, तर शेतकऱ्यांची चूल पेटवणारे, रेशन देणारे आहोत. तुम्ही बिस्कीटचा पुडा तरी दिला आहे का? असा सवाल एकनाथ शिंदेंनी विरोधकांना केला. दसरा मेळाव्याच्या मंचावरून विरोधकांचा समाचार घेतल्यानंतर शिंदेंनी कार्यकर्त्यांचा निरोप घेण्यास सुरुवात केली. परंतु मेळाव्यात त्यांना एक गोष्ट खटकली. त्यावेळी दसरा मेळाव्यातील आयोजकावर जोरदार हल्लाबोल केला. नेस्को सेंटरवरील भाषण संपलं. त्यानंतर मंचावरूनच एकनाथ शिंदेंनी आयोजकांना कडक शब्दात सुनावले. अरे आयोजन कुणी केलेलं? मला कोपऱ्यात कुणी टाकलं? पुढील वेळेस मला लोकांच्या समोर पाहिजे. हे लक्षात ठेवा, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी आयोजकांचे कान टाचले.
एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांसाठी काय घोषणा केली?
एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. त्यांनी शेतकऱ्यांना दिवाळीचा शिधा देण्याचे काम सुरू केल्याचे सांगितले. एक दिवसही मला शिव्या दिल्याशिवाय जात नाही. आमच्यावर टीका केली जाते. परंतु आम्ही कामातून उत्तर देऊ. आम्ही फक्त भाषण देत नाही. तर शेतकऱ्यांना रेशन देणारे आहोत. आम्ही परभणीत 25 हजार शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं आहे. तर शेतकऱ्यांच्या मुलींना 25000 सायकलीचं वाटप करण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ केला आहे. शेतकऱ्यांच्या मुलीचं लग्न असेल, तर त्या लेकीचं लग्न करण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. शेतकऱ्यांसाच्या लेकीसाठी सामूहिक विवाहसोहळे आयोजित केली जाईल. यात आम्ही कुठेही मागे राहणार नाही’.
