AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : 500 कोटी प्रकरणात जरांगेंचे एकनाथ शिंदेंवर आरोप, दसरा मेळाव्यात शिंदेंचे मौन

एकनाथ शिंदे आज दसरा मेळाव्यात खूप वेळ बोलले पण त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना उत्तर... जरांगेंनी शिंदेंना आव्हान दिलं होतं की, त्यांनी ५०० कोटींच्या प्रकरणावर दसरा मेळाव्यात बोलावं.

Eknath Shinde : 500 कोटी प्रकरणात जरांगेंचे एकनाथ शिंदेंवर आरोप, दसरा मेळाव्यात शिंदेंचे मौन
Eknath Shinde avoided responding to JarangeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 20, 2026 | 10:33 PM
Share

महाराष्ट्राची राजधानी राजकीय घडामोडींमुळे नेहमीच चर्चेत असते. आज दोन्हाी शिवसेनेचे दसरा मेळावे पार पडले. गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सेनेचा मेळावा पार पडला. तर शिवाजी पार्कात बाळासाहेब ठाकरे यांचा पारंपरिक दसरा मेळावा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पार पडला. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. मराठी अस्मितेवरुन उद्धव ठाकरेंनी शिंदेंना घेरलं. तर शिंदेंनी उद्धव ठाकरेंना २०१९ मध्ये मतदारांना धोका दिला, असं म्हणत त्यांच्यावर हल्लाबोल केला. दोन्ही सेनेच्या नेत्यांनी एकमेकांवर हल्लाबोल चढवला. पण विशष बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांनी या भाषणामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना उत्तर देण टाळलं आहे. नेस्को सेंटरमध्ये जवळपास एक तास एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं. त्यांच्याकडून जरांगेंना उत्तर देणं अपेक्षित होतं पण तसं झालेलं नाही.

जरांगेंनी नेमके कोणते आरोप केलेले?

मराठा आरक्षणाचा लढा सुरु असताना, विविध आंदोलनांनी जरांगेंनी राज्याचं लक्ष वेधलं होतं. पण विविध वेळी सरकारच्या शिष्टमंडळांनी त्यांची भेट घेतली, उपोषणं सोडली, पण ‘मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी मला ५०० कोटी रुपये दिले असल्याचं त्यांनी भाजपला सांगितल्याचा’ दावा त्यांनी केला आहे. ते आज दसरा मेळाव्यात बोलत होते. यावेळी जरांगेंनीही नारायण गडावर मोठं भाषण केलं. यावेळी ते प्रचंड संतापलेले दिसले. एवढच नाही तर यावर एकनाथ शिंदे यांनी या दसरा मेळाव्यातील भाषणामध्ये बोलावं, त्यांनी हा मुद्दा स्पष्ट करावा असं आव्हानही दिलं होतं. पण एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आरोपांना अजिबात उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे आता शिंदे यावर नेमकं कधी आणि काय बोलणार याबाबतचा सस्पेन्स कायम आहे.

दरम्यान, याप्रकरणी शिंदेंच्या इतर अनेक नेत्यांनी मनोज जरांगे पाटलांना उत्तरं दिली आहेत. अतिशय तीव्र भाषेत त्यांनी जरांगेंवर टीका केली आहे. जरांगे पाटलांच्या वक्तव्यावर मी देखील संभ्रमीत झालो आहे. माझं त्यांच्याशी कालच फोनवर बोलणं झालं. कोणीतरी गैरसमज पसरवत आहे. आजचा जरांगेंचा भाषणाचा विषय संभ्रमीत करणारा आहे. त्यांनी काल रात्री मला काहीतरी वेगळं सांगितलं होतं. त्यांच्याकडे व्हिडीओ असतील तर त्यांनी जारी करावे, आम्ही त्यांना जाब विचारु, जरांगेंना सांगणारी कोणती अदृश्य शक्ती असेल तर माहिती नाही, असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!