Wardha | अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, तूर पिकांचे नुकसान; शेतकरी हवालदिल
वर्धा जिल्ह्यातील काही भागांना अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला असून वादळी वारा आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी गव्हाचे पीक जमीनदोस्त झाले आहे. जिल्ह्यात काही भागांत गारपीटही झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिक भर पडली आहे.
वर्धा जिल्ह्यातील काही भागांना अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला असून वादळी वारा आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी गव्हाचे पीक जमीनदोस्त झाले आहे. जिल्ह्यात काही भागांत गारपीटही झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिक भर पडली आहे. अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची पेरणी केली होती आणि पीक काढणीच्या अवस्थेत आले होते. मात्र ऐन वेळी झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे हरभरा, गहू तसेच तूर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय कांदा आणि भाजीपाला पिकांनाही फटका बसला आहे. आधीच खरीप हंगामात नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाकडून अपेक्षा ठेवली होती. मात्र अवकाळी पावसामुळे या पिकांवरही पाणी फेरले गेले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागांची तात्काळ पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले असून शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Published on: Feb 24, 2026 11:42 AM
भाजप शिवसेना संपवाचं काम करतंय, हे आता... बंडखोरीनंतर सत्तारांनी अखेर
कोण कुणाविरुद्ध? विधान परिषद निवडणुकीतील मोठ्या लढतींचं चित्र स्पष्ट
एकनाथ शिंदेंचा आदेश धाब्यावर? रायगडमध्ये शिवसेनेची बंडखोरी?
कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ, आता सर्वात मोठं आंदोलन,

