Virat Kohli Ex-Girlfriend: विराट कोहलीला कशा मुली आवडतात? एक्स गर्लफ्रेंडकडून क्रिकेटरची पोलखोल
Virat Kohli Ex-Girlfriend: '12 वर्ष झालीत...', एक्स - गर्लफ्रेंडकडून अभिनेत्याची पोलखोल..., क्रिकेटरला कशा मुली आवडतात? एका गोष्टीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला विराट कोहली...

Virat Kohli Ex-Girlfriend: भारतीय क्रिकेट विश्वाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो… पण आता विराट कोहली त्याचं खासगी आयुष्य किंवा खेळामुळे नाही तर, इन्स्टाग्राममुळे चर्चेत आला आहे. नुकताच विराट कोहली याने जर्मन इन्फ्लुएंसरची एक पोस्ट लाईक केल्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. जर्मन इन्फ्लुएंसरची पोस्ट लाईक केल्यामुळे विराट याच्या एक्स गर्लफ्रेंडने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विराट कोहली याची एक्स गर्लफ्रेंड इसाबेल लेटी, बायको अनुष्का शर्मा, जर्मन व्लॉगर लिजलैज आणि अवनीत कौर यांच्यासंबंधी एक पोस्ट शेअर करत ‘टेस्ट इन वुमन’ बद्दल भाष्य केलं आहे. आता या व्हायरल पोस्टवर इसाबेल लेटी हिने मोठं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाली इसाबेल लेटी?
व्हायरल पोस्टमध्ये विराट कोहलीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल केलेल्या टिप्पणी इसाबेल लेटी हिला आवडल्या नाहीत. ती कमेंट करत म्हणाली, ’12 वर्ष झाली आहेत, तरी देखील लोक यातून अद्यापही बाहेर आलेले नाहीत…?’ इसाबेल लेटी हिची कमेंट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी तिचं समर्थन देखील केलं..
जुने मुद्दे पुन्हा पुन्हा उकरून काढणं चुकीचं आहे, असं इसाबेल स्पष्टपणे सांगताना दिसत आहे. एवढंच नाही तर, 2014 मध्ये इसाबेलने स्वतःच स्पष्ट केलं होतं की, ती आणि विराट दोन वर्षे नात्यात होते. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
लाईक्समुळे वाद आणि चर्चांना उधाण…
ही पहिली वेळ नाही जेव्हा विराट कोहली सोशल मीडियामुळे चर्चेत आला आहे. याआधी देखील अभिनेत्री अवनीत कौर हिचा फोटो लाईक केल्यामुळे विराट चर्चेत आलेला. तेव्हा ‘एल्गोरिदम एरर’ असल्याचं त्याने स्पष्टीकरण दिलं. नुकताच, जर्मन इन्फ्लुएंसर लिजलॅज हिच्या पोस्टवर देखील लाईक त्यानंतर अनलाईक केल्यामुळे वादाला नवीन कारण मिळालं आहे… यावेळी विराट याने कोणतंच स्पष्टीकरण दिलं नाही. पण लिजलॅज म्हणाली, या संपूर्ण परिस्थितीबद्दल तिला विराटसाठी थोडं वाईट वाटलं. ती म्हणाली, एका साध्या लाइकमुळे एवढा वाद कशाला? हे अद्याप मला कळू शकलेलं नाही.
विराट कोहली याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, 2017 मध्ये विराट याने अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासोबत लग्न केलं आणि दोन मुलांचं जगात स्वागत केलं… विराट आणि अनुष्का यांनी मुलांसाठी ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवली आहे. सोशल मीडियावर देखील दोघे कायम सक्रिय असतात.