AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर’संदर्भातील त्या रीलवर एका ‘लाईक’मुळे हंगामा! प्रसिद्ध दिग्दर्शकावर भडकले चाहते

प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी 'धुरंधर' या चित्रपटासंदर्भातील एक रील लाईक केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या रीलमध्ये धुरंधरच्या चाहत्यांची तुलना नाझींशी करण्यात आली आहे. नेमकं काय घडलं, ते जाणून घ्या..

'धुरंधर'संदर्भातील त्या रीलवर एका 'लाईक'मुळे हंगामा! प्रसिद्ध दिग्दर्शकावर भडकले चाहते
Ranveer Singh and Vishal BhardwajImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 10, 2026 | 1:15 PM
Share

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज हे सोशल मीडियावरील एका ‘लाईक’मुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ‘धुरंधर 2’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या प्रेक्षकांची तुलना नाझींशी करणाऱ्या एका रीलला त्यांनी ‘लाईक’ केलं. त्यांच्या या एका लाईकवरून हा वाद निर्माण झाला आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात लहानातली लहान गोष्टसुद्धा लोकांच्या नजरेतून सुटत नाही. विशाल भारद्वाज यांच्या बाबतीत नेमकं हेच घडलंय. एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका युजरने स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण चांगलंच तापलं.

या स्क्रीनशॉटमध्ये पहायला मिळतंय की विशाल भारद्वाज यांनी ‘तुम्ही धुरंधर का पाहिला नाही?’ असं टायटल असलेली एक रील लाईक केली आहे. या रीलमध्ये ऑगस्ट लँडमेसर यांचा एक ऐतिहासिक फोटो वापरण्यात आला आहे, ज्यामध्ये ते गर्दीत एकटे उभे राहून हिटलरला सलाम करण्यास नकार देत असल्याचं दिसत होते. म्हणजेच ‘धुरंधर’च्या चाहत्यांची विचारसरणी ही नाझींच्या विचारसरणीसारखीच आहे, असं या रीलमधून सूचित करण्याचा प्रयत्न केला गेला. अशा रीलला विशाल भारद्वाज यांनी लाईक करताच त्याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला.

विशाल भारद्वाज यांनी लाईक केलेली रील

‘विशाल भारद्वाज अशा पोस्टला लाईक करत होत, ज्यात चित्रपटाच्या प्रेक्षकांची तुलना जर्मनीच्या नाझींशी केली होती. धुरंधर या चित्रपटाच्या यशाने इंडस्ट्रीतील अनेकजण नाराज झाले आहेत, हे स्टँडअप कॉमेडियन जाकिर खानचं वक्तव्य खरं ठरतंय’, असं संबंधित युजरने स्क्रीनशॉट शेअर करत म्हटलंय. यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. तर काहीजण भारद्वाज यांच्या बचावासाठीही पुढे आले आहेत. ‘लोकांना त्यांच्या आवडत्या चित्रपटांवर टीका करण्याचा किंवा एखादा चित्रपट नापसंत करण्याचा पूर्ण अधिकार आहे. भारद्वाज हे प्रखर राजकीय विचार असलेले एक सामान्य नागरिक आहेत आणि तो त्यांचा हक्क आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘हे खरं आहे की धुरंधर 2 या चित्रपटात काही प्रचारकी घटक होते, पण एकंदरित तो एक उत्तम चित्रपट आहे. भिन्न मतांचा आदर करणं ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे, नाही का’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे.

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली असली तरी त्यावर काही जणांकडून टीकासुद्धा होत आहे. हा चित्रपट प्रचारकी असल्याचं मत काहींनी नोंदवलं आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट