सलमानच्या घराबाहेरील गोळीबारानंतर विवेक ओबेरॉयचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत; चाहत्यांनी घेतली शाळा

| Updated on: Apr 17, 2024 | 2:15 PM

सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराच्या घटनेनंतर अभिनेता विवेक ओबेरॉयचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये तो बिष्णोई समाजाबद्दल बोलताना दिसून येत आहे. त्यावरून सलमानच्या चाहत्यांनी त्याची चांगलीच शाळा घेतली आहे.

सलमानच्या घराबाहेरील गोळीबारानंतर विवेक ओबेरॉयचा तो व्हिडीओ चर्चेत; चाहत्यांनी घेतली शाळा
सलमान खान, विवेक ओबेरॉय
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर रविवारी पहाटे दोन अज्ञातांनी गोळीबार केला. या घटनेनं सर्वत्र खळबळ माजली. यात कोणालाही दुखापत झाली नसली तर सलमानच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसुद्धा सलमानची भेट घेत सुरक्षेचं आश्वासन दिलं आहे. सलमानच्या घराबाहेर गोळीबार केल्याची जबाबदारी गुंड लॉरेन्स बिष्णोईचा धाकटा भाऊ अनमोल बिष्णोईने स्वीकारली आहे. लॉरेन्स बिष्णोईने याआधीही अनेकदा सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. काळवीट शिकार प्रकरणानंतर बिष्णोई गँग सलमानवर नाराज असून त्यांना त्याचा सूट घ्यायचा आहे. यादरम्यान आता अभिनेता विवेक ओबेरॉयचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विवेक हा बिष्णोईल समाजाचं कौतुक करताना दिसत आहे.

विवेकचा हा व्हिडीओ बऱ्याच वर्षांपूर्वीचा आहे. यामध्ये तो म्हणतोय, “या जगात फक्त एकच समुदाय आहे, बिष्णोई समुदाय. जिथे हरीण किंवा काळवीट मेल्यास त्याच्या पिल्लाला बिष्णोई समाजाच्या महिला आपल्या पोटच्या बाळाप्रमाणेच दूध पाजतात. आपल्या स्वत:च्या बाळाप्रमाणे त्याची काळजी घेतात.” हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सलमानचे चाहते विवेकला ट्रोल करत आहेत. ‘सलमानशी असलेल्या शत्रुत्वामुळे विवेक बिष्णोई समाजाचं कौतुक करतोय’, असं एकाने लिहिलंय. तर ‘गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि विवेक ओबेरॉय हे दोघं सलमानचे शत्रू आहेत’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

सलमान खानच्या वांद्रे इथल्या घराजवळ झालेल्या गोळीबारप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश मिळालं आहे. दोघांनाही गुजरातमधील भूज शहरातून अटक करण्यात आली. याप्रकरणी दोघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सहपोलीस (गुन्हे) आयुक्त लखमी गौतम यांनी दिली. गोळीबारानंतर आरोपींनी मोबाईल आणि पिस्तूल फेकले असून त्यासाठी लवकरच पोलिसांचं पथक गुजरातला जाणार आहे.

विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल अशी आरोपींची नावं असून त्यातील पाल याने अद्ययावत पिस्तुलाने सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला. एक आरोपी लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या थेट संपर्कात होता. त्यामुळे याप्रकरणी मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे.