काजोलच्या बहिणीला वयाच्या 46 व्या वर्षी बनायचंय आई; पण येतेय ‘ही’ अडचण

अभिनेत्री काजोलला बॉलिवूड इंडस्ट्रीत जितकं यश मिळालं, तितकं तिची बहीण तनिषा मुखर्जीला मिळालं नाही. 2003 मध्ये तनिषाचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. पण करिअरच्या पहिल्यावहिल्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच तनिषाचा मोठा अपघात झाला होता. त्यानंतर ती काही काळ कोमामध्ये होती.

काजोलच्या बहिणीला वयाच्या 46 व्या वर्षी बनायचंय आई; पण येतेय 'ही' अडचण
तनिषा मुखर्जी, काजोलImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 17, 2024 | 12:24 PM

अभिनेत्री काजोलला बॉलिवूड इंडस्ट्रीत जितकं यश मिळालं तितकं तिची बहीण तनिषा मुखर्जीला मिळालं नाही. तनिषाला बॉलिवूड चित्रपटांमध्ये फारसं यश मिळालं नसलं तरी नृत्यक्षेत्रात तिने उत्तम कामगिरी केली आहे. ‘झलक दिखला जा 11’ या डान्स शोमध्ये तिने स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. यामध्ये तिच्या नृत्याचं परीक्षक आणि प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक झालं. तनिषा तिच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती तिच्या लग्नाविषयी व्यक्त झाली. तनिषा लवकरच ‘लव्ह यू शंकर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तिने एका आईची भूमिका साकारली आहे. तनिषा 46 वर्षांची असून खऱ्या आयुष्यात तिचं अद्याप लग्न झालं नाही. मात्र पडद्यावर आईची भूमिका साकारल्यानंतर खऱ्या आयुष्यातही आई बनण्याची इच्छा तिने बोलून दाखवली.

या मुलाखतीत तनिषा लग्न आणि आई बनण्याच्या इच्छेबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. मात्र तनिषाला अद्याप अशी व्यक्ती भेटलीस नाही, ज्याच्यासोबत ती संपूर्ण आयुष्य घालवण्याचा निर्णय घेऊ शकेल. चित्रपटात आईची भूमिका साकारण्याबद्दल तनिषा म्हणाली, “आई होण्याचा अनुभव खूपच प्रेमळ असतो. मी खऱ्या आयुष्यात अद्याप तो अनुभव घेऊ शकली नाही. पण मी ऑनस्क्रीन या भूमिकेचा खूप आनंद घेतला आहे. चिमुकल्यासोबत मी सेटवर खूप मजामस्ती करायची.” या मुलाखतीत तनिषाला तिच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला ती पुढे म्हणाली, “लग्न तर मला करायचं आहे, पण त्यासाठी अपेक्षित अशी व्यक्ती मला अद्याप भेटली नाही. कदाचित त्यात आणखी काही वेळ लागू शकतो.”

हे सुद्धा वाचा

तनिषाने 2003 मध्ये ‘श्श्श्श..’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अपघात झाल्याचा खुलासा तिने एका मुलाखतीत केला होता. हा अपघात इतका भयंकर होता की त्यात तिला गंभीर दुखापत झाली आणि ती कोमात गेली होती. तनिषा मुखर्जीने ‘श्श्श्श..’ या चित्रपटानंतर ‘नील अँड निक्की’, ‘सरकार’, ‘टँगो चार्ली’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्येही तिने भाग घेतला होता. या सिझनमध्ये तिची आणि अरमान कोहलीची जोडी विशेष चर्चेत होती. मात्र बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर दोघांचा ब्रेकअप झाला. तनिषा आजही सिंगल आहे.

Non Stop LIVE Update
बीड मतदारसंघात घडलंय काय? बूथ कॅप्चरचा कुणाचा आरोप? व्हिडीओ आला समोर
बीड मतदारसंघात घडलंय काय? बूथ कॅप्चरचा कुणाचा आरोप? व्हिडीओ आला समोर.
हे तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा, दादांवरील प्रश्नावर पवारांचं थेट उत्तर
हे तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा, दादांवरील प्रश्नावर पवारांचं थेट उत्तर.
विशाल अग्रवालला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, कोर्टान नोंदवला हा गुन्हा
विशाल अग्रवालला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, कोर्टान नोंदवला हा गुन्हा.
जीवंत माणसं चिरडली जाताय, कुठय तुमच...रोहित पवार आक्रमक थेट केला सवाल
जीवंत माणसं चिरडली जाताय, कुठय तुमच...रोहित पवार आक्रमक थेट केला सवाल.
मग अमित ठाकरे का नाही? नितेश राणे नेमकं काय म्हणाले?
मग अमित ठाकरे का नाही? नितेश राणे नेमकं काय म्हणाले?.
महायुतीत आहोत याची जाणीव ठेवा; अडसूळांनी भाजप नेत्याला फटकारलं
महायुतीत आहोत याची जाणीव ठेवा; अडसूळांनी भाजप नेत्याला फटकारलं.
लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजलं बिगूल
लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजलं बिगूल.
अपघातवेळी ड्रायव्हिंग सीटवर कोण होत? पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा काय?
अपघातवेळी ड्रायव्हिंग सीटवर कोण होत? पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा काय?.
पुणे हिट अँड रन केसमध्ये दबाव की दिरंगाई? पोलीस आयुक्तांनी सांगितलं...
पुणे हिट अँड रन केसमध्ये दबाव की दिरंगाई? पोलीस आयुक्तांनी सांगितलं....
दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावले, केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर भरकटलं अन
दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावले, केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर भरकटलं अन.