AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मलायकाने ‘व्हर्जिनिटी’बाबत प्रश्न विचारताच मुलगा म्हणाला; “तू कधी…?”

अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा मुलगा अरहान खान याने पॉडकास्टर म्हणून करिअरची सुरुवात केली आहे. ‘डंब बिर्याणी’ हा त्याचा पॉडकास्ट युट्यूबवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या पॉडकास्टमधील पुढील एपिसोडमध्ये मलायकाने हजेरी लावली आहे.

मलायकाने 'व्हर्जिनिटी'बाबत प्रश्न विचारताच मुलगा म्हणाला; तू कधी...?
Malaika Arora with son Arhaan KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 17, 2024 | 9:28 AM
Share

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा मुलगा अरहान खान याने नुकताच आपला पॉडकास्ट लाँच केला आहे. ‘डंब बिर्याणी’ असं या पॉडकास्टचं नाव असून यामध्ये खान कुटुंबीयांनंतर आता खुद्द मलायका हजेरी लावणार आहे. अरहान त्याच्या मित्रांसोबत या पॉडकास्टमध्ये प्रेम, रिलेशनशिप या सर्व विषयांवर गप्पा मारताना दिसतोय. याआधी त्याचे वडील अरबाज खान आणि काका सोहैल खान यांनी पॉडकास्टमध्ये विविध मुद्द्यांवरून मोकळेपणे गप्पा मारल्या होत्या. त्यानंतर आता मलायका मुलाच्या शोमध्ये येणार आहे. यावेळी मायलेकामध्ये बऱ्याच विषयांवर चर्चा झाली. पण मलायकाच्या एका प्रश्नाने नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. इतकंच नव्हे तर त्या प्रश्नावर अरहानने दिलेलं उत्तरसुद्धा चर्चेत आलं आहे.

‘डंब बिर्याणी’ या वॉडकास्टच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या एपिसोडचा रंजक टीझर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये मलायका तिच्या मुलाला थेट विचारते की, “तुझं कौमार्यभंग (व्हर्जिनिटी लूज) कधी झालं?” आईच्या तोंडून हा प्रश्न ऐकताच अरहान नि:शब्द झाला. पण क्षणभर विचार केल्यानंतर त्याने आईलाच प्रतिप्रश्न विचारला. “तुला लोकांमध्ये मिळून-मिसळून राहायला आवडतं का?” मुलाच्या या प्रश्नावर मलायका नकारार्थी उत्तर देते. यानंतर अरहान तिला आणखी मोठा प्रश्न विचारतो. “तू लग्न कधी करतेय?”, असं तो आईला विचारतो. मायलेकामधील हा संवाद ऐकून नेटकरीसुद्धा अवाक् झाले आहेत. हे कुटुंबच नॉर्मल नाही, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

View this post on Instagram

A post shared by dumb biryani (@dumbbbiryani)

अरबाज आणि मलायका हे लग्नाच्या 19 वर्षांनंतर विभक्त झाले. 2017 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अरबाजने मेकअप आर्टिस्ट शुराशी दुसऱ्यांदा निकाह केला. तर मलायका ही गेल्या काही वर्षांपासून अभिनेता अर्जुन कपूरला डेट करतेय. या दोघांना विविध मुलाखतींमध्ये लग्नाबाबत प्रश्न विचारला गेला आहे.

मलायका आणि अरबाज हे बॉलिवूड इंडस्ट्रीत चर्चेत राहणारी जोडी होती. त्यामुळे या दोघांचा घटस्फोटसुद्धा तितकाच चर्चेत होता. हे दोघं का विभक्त होत आहेत, घटस्फोटानंतर मलायकाने अरबाजकडे किती पोटगी मागितली, असे प्रश्न अनेकांना पडले होते. 2016 मध्ये दोघांनी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता आणि त्यानंतर 2017 मध्ये अखेर दोघं अधिकृतरित्या विभक्त झाले.

हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.