AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 RCB Schedule : गतविजेता 19 व्या मोसमासाठी सज्ज, आरसीबीसमोर पहिल्या सामन्यात कुणाचं आव्हान?

Royal Challengers Bengaluru 2026 Schedule : गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पहिल्या टप्प्यात आपले एकूण 4 सामने खेळणार आहेत. आरसीबी त्यापैकी 2 सामने घरच्या मैदानात खेळणार आहे.

IPL 2026 RCB Schedule : गतविजेता 19 व्या मोसमासाठी सज्ज, आरसीबीसमोर पहिल्या सामन्यात कुणाचं आव्हान?
IPL 2026 RCB ScheduleImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 13, 2026 | 5:22 AM
Share

आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची  गेल्या वर्षी 2025 साली 17 वर्षांची प्रतिक्षा संपली. रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आरसीबीने आयपीएल 18 व्या मोसमातील (IPL 2025) अंतिम सामन्यात श्रेयस अय्यर याच्या पंजाब किंग्सला पराभूत केलं. रजतने यासह आरसीबाला पहिल्यांदा आयपीएल चॅम्पियन केलं. यासह विराट कोहली, आरसीबी फ्रँचायजी आणि  चाहत्यांचं आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं.  आता आरसीबी 19 व्या मोसमात (IPL 2026) गतविजेता म्हणून उतरणार आहे. त्यामुळे आरसीबीसमोर ट्रॉफी कायम राखण्याचं आव्हान असणार आहे. आयपीएलकडून या 19 व्या मोसमाचं 11 मार्च रोजी पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. प्रत्येक संघाला या पहिल्या टप्प्यात किमान 3 सामने खेळायला मिळणार आहेत. या निमित्ताने आपण आरसीबीचं पहिल्या टप्प्यात कधी आणि कुणाविरुद्ध सामने होणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.

आरसीबीचे पहिल्या टप्प्यात एकूण 4 सामने

आरसीबी पहिल्या टप्प्यात एकूण 4 सामने खेळणार आहे.आरसीबीचे या 4 पैकी 2 सामने घरच्या मैदानात होणार आहेत. तर आरसीबीला उर्वरित 2 सामने हे प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानात खेळावे लागणार आहेत. आरसीबी मोहिमेतील पहिलाच सामना 28 मार्च रोजी शनिवारी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध खेळणार आहे. आरसीबीसमोर पहिल्या फेरीत सनराजयर्स हैदराबाद,  चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सचं आव्हान असणार आहे. आरसीबी आपल्या मोहिमेतील पहिले 2 सामने घरच्या मैदानात खेळणार आहे. तर त्यानंतर आरसीबाला पहिल्या टप्प्यातील शेवटच्या 2 सामन्यांमध्ये राजस्थान आणि मुंबई या संघांच्या घरच्या मैदानात क्रिकेट सामने खेळावे लागणार आहेत. या निमित्ताने कोणता सामना कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

आरसीबीचं पहिल्या टप्प्यातील 4 सामन्यांचं वेळापत्रक

पहिला सामना, 28 मार्च, विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, बंगळुरु

दुसरा सामना, 5 एप्रिल, विरुद्ध सीएसके, बंगळुरु

तिसरा सामना, 10 एप्रिल, विरुद्ध राजस्थान रॉयल्स, गुवाहाटी

चौथा सामना, 12 एप्रिल, विरुद्ध मुंबई इंडियन्स, मुंबई

आयपीएल 2026 साठी आरसीबी टीम : रजत पाटीदार (कर्णधार), टीम डेव्हीड, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिलीप सॉल्ट, जितेश शर्मा, जेकब बेथेल, कृणाल पंड्या, रोमारीयो शेफर्ड, जोश हेझलवुड, रसिक सलाम दार, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, स्वप्नील सिंग, यश दयाल, नुवान तुषारा, व्यंकटेश अय्यर, जेकब डफी, मंगेश यादव, जॉर्डन कॉक्स, विहान मल्होत्रा, कनिष्क चौहान, अभिनंदन सिंग, विकी ओस्तवाल आणि सात्विक देसवाल.

Follow Us
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल