AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BAN vs PAK : बांगलादेश सामन्यासह मालिका विजयासाठी सज्ज, पाकिस्तानसाठी करो या मरो, कोण जिंकणार?

Bangladesh vs Pakistan 2nd ODI Live Streaming : बांगलादेश पाकिस्तान विरूद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे बांगलादेशला सलग दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे

BAN vs PAK : बांगलादेश सामन्यासह मालिका विजयासाठी सज्ज, पाकिस्तानसाठी करो या मरो, कोण जिंकणार?
Bangladesh vs Pakistan 2nd ODI PreviewImage Credit source: @BCBtigers X Account and PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 13, 2026 | 1:59 AM
Share

यजमान बांगलादेशने पाकिस्तान विरूद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत विजयी सलामी दिली. बांगलादेशे पाकिस्तानला 11 मार्च रोजी लोळवलं. बांगलादेश पाकस्तानवर एकतर्फी फरकाने मात करत विजयाचं खातं उघडलं. बांगलादेश पाकिस्तान विरूद्धच्या या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे बांगलादेशला सलग दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानसाठी हा सामना करो या मरो आणि प्रतिष्ठेचा असा आहे. पाकिस्तानला मालिकेतील आव्हान कायम राखायचं असेल तर कोणत्याही स्थितीत दुसरा सामना जिंकावा लागणार आहे. बांगलादेश सलग दुसरा सामना जिंकून मायदेशात मालिका सुरक्षितपणे जिंकण्यात यशस्वी ठरणार की पाकिस्तान विजयी खातं उघडून मालिकेत बरोबरी साधणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या निमित्ताने उभयसंघातील दुसऱ्या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान दुसरा एकदिवसीय सामना कधी?

बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान दुसरा एकदिवसीय सामना शुक्रवारी 13 मार्चला होणार आहे.

बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान दुसरा एकदिवसीय सामना कुठे?

बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान दुसरा एकदिवसीय सामना ढाक्यातील शेरे ए बांगला नॅशनल स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?

बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार पावणे 2 वाजता सुरुवात होईल. तर त्याआधी 1 वाजून 15 मिनिटांनी टॉस होईल.

बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान दुसरा एकदिवसीय सामना टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान दुसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर दाखवण्यात येणार नाही. तर लाईव्ह मॅच फॅनकोड एपद्वारे लाईव्ह पाहता येईल.

बांगलादेश-पाकिस्तानपैकी वनडेत वरचढ कोण?

दरम्यान बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यात शुक्रवारी होणारा 41 वा एकदिवसीय सामना असणार आहे. आतापर्यंत उभयसंघात एकूण 40 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. पाकिस्तानने या 40 पैकी सर्वाधिक सामन्यांमध्ये बांगलादेश विरुद्ध विजय मिळवला आहे. पाकिस्तानला बांगलादेश विरुद्ध 40 पैकी 34 सामने जिंकण्यात यश आलं आहे. तर बांगलादेशने पाकिस्तानवर 6 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे आता बांगलादेश एकूण सातवा एकदिवसीय सामना जिंकून मालिका नावावर करणार की पाकिस्तान पहिल्या पराभवाची परतफेड करणार? हे सामन्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...