AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BAN vs PAK : ज्यांच्यासाठी Iccसोबत पंगा, त्यांनीच गेम केला, बांगलादेशकडून पाकिस्तानचा धुव्वा

Bangladesh vs Pakistan 1st Odi Match Result : टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर पाकिस्तानला बांगलादेशकडून लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.

BAN vs PAK : ज्यांच्यासाठी Iccसोबत पंगा, त्यांनीच गेम केला, बांगलादेशकडून पाकिस्तानचा धुव्वा
BAN vs PAK 1st OdiImage Credit source: X Via Tv9 Bharatvarsh and Icc X Account
| Updated on: Mar 11, 2026 | 8:44 PM
Share

बांगलादेशमधील वाढत्या तणावानंतर केकेआरने बीसीसीआयच्या आदेशानुसार मिस्तफिजुर रहमान याची टीममधून हकालपट्टी केली. त्यानंतर अचानक बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सुरक्षेचं कारण पुढे करत भारतात होणाऱ्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने श्रीलंकेत खेळवण्यात यावे, अशी मागणी केली. मात्र आयसीसीने मागणी फेटाळल्यानंतर बांगलादेशने या स्पर्धेवर बहिष्कार टाकला. त्यानंतर पाकिस्तान बांगलादेशसाठी आयसीसी विरुद्ध मैदानात उतरली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बांगलादेशला स्पर्धेत सहभागी करावं या मागणीसाठी पाकिस्तानने टीम इंडिया विरुद्ध 15 फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्यात खेळणार नसल्याची भूमिका घेतली होती. मात्र त्याच काही फायदा झाला नाही. पाकिस्तानला शेवटची टीम इंडिया विरुद्ध खेळावं लागलं.

बांगलागदेशकडून पाकिस्तानचा गेम

आता पाकिस्तानने ज्यांच्यासाठी इतका उपदव्याप केला त्या बांगलादेशनेच त्यांचा मोठा गेम केला आहे. टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 मधून बाहेर झाल्यानंतर पाकिस्तानची 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत पराभवाने सुरुवात झाली. बांगलादेशने पाकिस्तानचा एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात टी 20i स्टाईलने धुव्वा उडवला आहे.

बांगलादेशचा दणदणीत विजय

पाकिस्तान सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. उभयसंघातील पहिला एकदिवसीय सामना हा 11 मार्चला ढाक्यातील शेरे बांगला नॅशनल स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. बांगलादेशने या सामन्यात पाकिस्तानचं 114 रन्सवर पॅकअप केलं. त्यानंतर बांगलादेशने विजयी आव्हान 91 बॉलमध्ये पूर्ण करत पाकिस्तानचं पॅकअप केलं. बांगलादेशने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली.

सामन्यात काय झालं?

बांगलादेशने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानसाठी फहीम अश्रफ याने सर्वाधिक 37 धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानला 100 पार मजल मारता आली. तर इतर फलंदाजांचा नाहिद राणा आणि कॅप्टन मेहदी हसन मिराज या दोघांचा कार्यक्रम केला. नाहिदने 5 विकेट्स मिळवल्या. तर मेहदीने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर इतरांनीही चांगली साथ दिली. अशाप्रकारे बांगलादेशने पाकिस्तानला 30.4 ओव्हरमध्ये 114 रन्सवर ऑलआऊट केलं.

बांगलादेशची विजयी सलामी

त्यानंतर बांगलादेशने तांझिद हसन तमिम याने केलेल्या नाबाद 67 धावांच्या जोरावर सहज विजय मिळवला. बांगलादेशने 15.1 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून विजयी धावा पूर्ण केल्या. बांगलादेशसाठी तांझिद व्यतिरिक्त नजमुल शांतो याने 27 धावांचं योगदान दिलं.आता उभयसंघातील दुसरा आणि निर्णायक क्रिकेट सामना हा शुक्रवारी 13 मार्च रोजी होणार आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच