Ramayana: बाहुबली फेम राजामौली यांना कसा वाटला ‘रामायण’, रणबीर, साई-यश बद्दल काय म्हणाले ?

भारतीय सिनेमा जगतातील सर्वात महागडा चित्रपट 'रामायण' याचे प्रदर्शन अखेर आजपासून सुरु झाले आहे. या चित्रपटाच्या संदर्भात अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. आता बाहुबली फेम दिग्दर्शक राजामौली यांनी या सिनेमाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

Ramayana: बाहुबली फेम राजामौली यांना कसा वाटला ‘रामायण’, रणबीर, साई-यश बद्दल काय म्हणाले ?
Ramayana film
| Updated on: Nov 05, 2026 | 5:13 PM

SS Rajamouli On Ramayana: भारतीय सिनेमा जगतातील सर्वात महागडा चित्रपट ‘रामायण’ अखेर आज 5 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. भारतीय चित्रपटाला जागतिक पातळीवर रिलीज करण्याचे निर्माता नमित मल्होत्रा यांचे व्हीजन समोर आले आहे. या चित्रपटाला चित्रपट समीक्षकांसह प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शना खाली तयार केलेल्या ‘रामायण’ या चित्रपटाला बाहुबली फेम लोकप्रिय दिग्दर्शक एसएस राजामौली यांची देखील पसंती मिळाली आहे.

राजामौली यांनी आपल्या बाहुबली सिनेमात पहिल्यांदा मोठ्या स्केलवर व्हिडीओ ग्राफीक्सचा पुरेपूर वापर केला होता. त्यानंतर असा अनेक चित्रपटात असे ग्राफीक्स वापरण्यात आले होते. आता पौराणिक गाथा रामायण या स्वरुपात सादर झाला आहे. एसएस राजामौली यांनी एका पोस्टद्वारे रामायण चित्रपटाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी नमित मल्होत्रा आणि नितेश तिवारी यांचे व्हीजन आणि अभिनेता रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या अभिनयाची तारीफ केली आहे. राजामौली यांनी क्लायमॅक्स सह प्री-क्लायमेक्स देखील खूप पसंत आलेला आहे. त्यांनी चित्रपटाच्या व्ह्युजअल्सला शानदार म्हटले आहे.

Loading...

 

राजामौली ‘रामायण’ काय म्हटले ?

एसएस राजामौली यांनी X वर लिहिले की, “रामायण…चित्रपटाची दृश्ये विशाल पडद्यावर पाहण्यास अद्भूत आहेत. रामाच्या रुपात रणबीर, खासकरुन वनवासानंतरचा राम शांत आणि शानदार वाटला. रावणाच्या भूमिकेत यश याचा अंदाजही खूपच खूंकार वाटला. तसेच सीतेच्या रुपात साई पल्लवी खूपच ग्रेसफूल वाटली. प्री -क्लायमॅक्स आणि क्लायमॅक्स, मला याचा प्रत्येक भाग खूप आवडला.”

त्यांनी पुढे लिहिलेय की, ” नमित मल्होत्रा, नितेश तिवारी आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन, ज्यांनी एवढ्या मोठ्या व्हीजनला सुंदरतेने पडद्यावर साकारले आहे.” या पोस्टमुळे राजामौली यांनी रामायण दिलेली दाद समजते.

राजामौली याचा वाराणसी येतोय…

राजामौली यांचा वाराणसी देखील एक मोठा चित्रपट आहे. ज्यात प्रियंका चोप्रा आणि महेश बाबू यांनी काम केले आहे. या वाराणसी देखील स्पेशल इफेक्टमुळे चर्चेत असून रामायण नंतर या चित्रपटाचे मोठे बजेट आहे. एकीकडे रामायणच्या पार्ट 2 चे बजेट 4,000 कोटी आहे. तर वाराणसी चित्रपटाचे बजेट 1300 कोटी रुपये आहे. राजामौली यांचा वाराणसी येत्या 7 एप्रिल 2027 रोजी रिलीज होत आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us