AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टायगर श्रॉफचे खरे नाव काय? 99 टक्के चाहत्यांना माहितीच नाही, गोळीबाराच्या घटनेनंतर समोर आला लहानपणीचा किस्सा

टायगर श्रॉफचे खरे नाव ‘टायगर’ नाही. बालपणीच्या एका विचित्र सवयीमुळे मिळाले होते त्याला हे टोपणनाव. जाणून घ्या अभिनेत्याच्या नावामागची रंजक कहाणी.

टायगर श्रॉफचे खरे नाव काय? 99 टक्के चाहत्यांना माहितीच नाही, गोळीबाराच्या घटनेनंतर समोर आला लहानपणीचा किस्सा
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 19, 2026 | 1:47 PM
Share

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ हा आपल्या दमदार फिटनेस, मार्शल आर्ट्समधील कौशल्य आणि जबरदस्त डान्ससाठी ओळखला जातो. आपल्या अ‍ॅक्शनप्रधान चित्रपटांमधून त्याने चाहत्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र, टायगर श्रॉफच्या नावामागे एक रंजक गोष्ट दडलेली आहे. अनेक चाहत्यांना कदाचित माहिती नसेल की, ‘टायगर श्रॉफ’ हे त्याचे जन्माच्या वेळी ठेवलेले नाव नाही. त्याचे खरे नाव जय हेमंत श्रॉफ असे आहे. विशेष म्हणजे, बालपणीच्या एका विचित्र सवयीमुळे त्याला ‘टायगर’ हे नाव मिळाल्याचे सांगितले जाते.

टायगर श्रॉफचा जन्म 2 मार्च 1990 रोजी झाला. त्याचे वडील जॅकी श्रॉफ हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत तर आई आयशा श्रॉफ या निर्मात्या आहेत. चित्रपटसृष्टीशी संबंधित कुटुंबात जन्मलेल्या टायगरने स्वतःच्या मेहनतीने आणि कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केली.

टायगरचे मूळ नाव जय हेमंत श्रॉफ असे आहे. मात्र, चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना त्याने ‘टायगर श्रॉफ’ हे नाव स्वीकारले. आज हेच नाव त्याची व्यावसायिक ओळख बनले आहे. त्याच्या नावातील वेगळेपणामुळेही तो चाहत्यांमध्ये चर्चेत असतो.

बालपणीच्या कोणत्या सवयीमुळे मिळाले ‘टायगर’ नाव?

टायगर श्रॉफच्या नावामागे त्याच्या बालपणीची एक मजेशीर आठवण जोडलेली आहे. एका जुन्या मुलाखतीत त्याने सांगितल्याचे वृत्त आहे की, लहानपणी त्याला लोकांना चावण्याची सवय होती. प्रेम व्यक्त करताना किंवा इतरांशी जवळीक साधताना तो कधीकधी लोकांना चावत असे.

त्याच्या या विचित्र सवयीमुळे कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींनी त्याला ‘टायगर’ असे म्हणायला सुरुवात केली. कालांतराने हे टोपणनाव इतके लोकप्रिय झाले की, मोठा झाल्यानंतरही त्याची ओळख याच नावाने कायम राहिली. पुढे चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना त्याने हेच नाव वापरले आणि आज ‘टायगर श्रॉफ’ हे नाव अ‍ॅक्शन, फिटनेस आणि स्टंट्ससाठी प्रसिद्ध झाले आहे.

‘हिरोपंती’पासून बॉलिवूडमधील प्रवासाला सुरुवात

टायगर श्रॉफने 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत होती. पहिल्याच चित्रपटातून त्याने आपल्या नृत्यकौशल्याची, शारीरिक क्षमतेची आणि अ‍ॅक्शन करण्याच्या शैलीची छाप प्रेक्षकांवर पाडली.

Follow Us
टायगर श्रॉफला भेटले मात्र...; राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
Ram Purneker On Tiger Shroff Car : टायगर श्रॉफला भेटले मात्र आमच्यासाठी वेळ नाही; राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
राहुल बोंद्रे यांच्या अडचणी वाढल्या! शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी...
राहुल बोंद्रे यांच्या अडचणी वाढल्या! शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी पोलिसांची नोटीस
पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंचे विरोधकांना खुले आव्हान;
पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंचे विरोधकांना खुले आव्हान; म्हणाले...
वाशिममध्ये दुष्काळाचा कहर! पाण्याअभावी हळदीचे पीक वाळले, शेतकरी...
वाशिममध्ये दुष्काळाचा कहर! पाण्याअभावी हळदीचे पीक वाळले, शेतकरी हतबल
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात, महायुतीची आघाडी
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात, महायुतीची आघाडी
शिंदे टायगर श्रॉफला भेटले, मग पुर्णेकर कुटुंबाला का नाही भेटले?- राऊत
Sanjay Raut: शिंदे टायगर श्रॉफला भेटले, मग पुर्णेकर कुटुंबाला का नाही भेटले?
टायगर श्रॉफ प्रकरणी CM फडणवीसांचा आक्रमक पवित्रा! मुंबई पोलीस ॲक्शन...
टायगर श्रॉफ प्रकरणी CM फडणवीसांचा आक्रमक पवित्रा! मुंबई पोलीस ॲक्शन मोडमध्ये
मुंबई गोळीबाराच्या अगदी तासाभरापूर्वी टायगर श्रॉफ चाहत्यांना भेटला;
मुंबई गोळीबाराच्या अगदी तासाभरापूर्वी टायगर श्रॉफ चाहत्यांना भेटला होता; व्हिडीओ व्हायरल, हल्लेखोर त्याच परिसरात होते?
गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीचा आज फैसला! सतेज पाटील की हसन मुश्रीफ...
गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीचा आज फैसला! सतेज पाटील की हसन मुश्रीफ, कोण मारणार बाजी?
टायगर श्रॉफच्या भेटीसाठी वेळ, पण प्रदीप पूर्णेकरांच्या घरी जाण्यासाठी
टायगर श्रॉफच्या भेटीसाठी वेळ, पण प्रदीप पूर्णेकरांच्या घरी जाण्यासाठी नाही? राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप