AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिर्झापूरमधील मालती भाभी कोण? जिच्या मुन्ना भैयासोबतच्या सीनने सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ

‘मिर्झापूर: द मूव्ही’मधील ‘मालती भाभी’ने वेधलं लक्ष; सिजा शॅननच्या व्हायरल सीनची सोशल मीडियावर चर्चा.

मिर्झापूरमधील मालती भाभी कोण? जिच्या मुन्ना भैयासोबतच्या सीनने सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 12, 2026 | 7:27 PM
Share

‘मिर्झापूर: द मूव्ही’ सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील कथा, जुन्या कलाकारांचे दमदार अभिनय आणि नव्या कलाकारांच्या एंट्रीमुळे हा सिनेमा चर्चेत आहे. याच चित्रपटातील एका नव्या चेहऱ्याने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेत्री आणि मॉडेल सिजा शॅनन ‘मालती भाभी’च्या भूमिकेत दिसली असून तिचा एक सीन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

या सीननंतर सिजा शॅनन नेमकी कोण आहे, याचा शोध प्रेक्षक इंटरनेटवर घेऊ लागले आहेत. सिजा ही अभिनेत्री आणि फॅशन मॉडेल असून चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी तिने मॉडेलिंगमध्ये काम केले आहे. तिची उंची आणि वेगळा लूक यामुळे तिने मॉडेलिंगच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली.

एमिटी युनिव्हर्सिटीमध्ये घेतले शिक्षण

सिजा शॅननने एमिटी युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतले आहे. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी तिने Film and TV Connection येथून अभिनयाचे प्रशिक्षणही घेतले. मॉडेलिंगचा अनुभव आणि अभिनयाचे प्रशिक्षण यामुळे कॅमेऱ्यासमोर काम करण्याचा तिचा आत्मविश्वास वाढला.

‘मिर्झापूर: द मूव्ही’मध्ये झळकल्यानंतर सिजाची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटला 34 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. चित्रपटातील व्हायरल सीननंतर चाहते तिच्या जुन्या पोस्ट आणि फोटोही मोठ्या प्रमाणात पाहत आहेत. त्यामुळे सिजाची सोशल मीडिया लोकप्रियताही झपाट्याने वाढताना दिसत आहे.

‘मिर्झापूर: द मूव्ही’मध्ये जुन्या-नव्या कलाकारांची मांदियाळी

‘मिर्झापूर: द मूव्ही’ 4 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून प्रदर्शनाच्या सुरुवातीच्या चार दिवसांत चित्रपटाने जगभरात 154 कोटी रुपयांहून अधिक कमाई केल्याचे सांगितले जाते.

चित्रपटात सोनल चौहान, रवी किशन आणि जितेंद्र कुमार यांसारखे नवे चेहरे दिसत आहेत. तर अली फजल, दिव्येंदू, पंकज त्रिपाठी, श्वेता त्रिपाठी आणि रसिका दुग्गल यांसारखे लोकप्रिय कलाकार आपल्या जुन्या भूमिकांमध्ये पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

दरम्यान, या सगळ्या कलाकारांमध्ये सिजा शॅननच्या ‘मालती भाभी’ या भूमिकेनेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता तिच्या आगामी प्रोजेक्ट्सकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम