AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा, कोण आहे समाधान सरवणकर? माजी नगरसेवक ते…

Tejaswini Lonari Engagement Samadhan Sarvankar : प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने नुकताच साखरपुडा केला असून तिच्या साखरपुड्याची काही खास फोटो पुढे आली आहेत. अभिनेत्रीने साखरपुडा कोणासोबत केला हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.

अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा, कोण आहे समाधान सरवणकर? माजी नगरसेवक ते...
Tejaswini Lonari engaged Samadhan Sarvankar
| Updated on: Oct 27, 2025 | 12:16 PM
Share

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने चाहत्यांना गोड बातमी दिली असून नुकताच तिचा साखरपुडा झाला. विशेष म्हणजे या साखरपुड्याची अनेक फोटो आणि व्हिडीओ पुढे येत आहेत. अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर याच्यासोबत साखरपुडा केला. तेजस्विनी लोणारी हिची फॅन फॉलोइंग जबरदस्त बघायला मिळते. अभिनेत्रीच्या साखरपुड्याबद्दल कळाताच चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्रीला तिच्या लग्नाबद्दल कधी प्रश्न केल्या तर ती भाष्य करणे टाळताना अनेकदा दिसली. आता थेट राजकारणात सक्रिय असलेल्या नेत्यासोबतच तिने लग्न केले. सरवणकर कुटुंबियांची सून तेजस्विनी लोणारी होणार आहे.

कोण आहेत समाधान सरवणकर जाणून घ्या  

वडील सदा सरवणकर यांच्या प्रमाणेच समाधान सरवणकर राजकारणात सक्रिय आहेत. शिवसेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर राहिले आहेत. सदा सरवणकर माहिम विधानसभा मतदारसंघाकडून शिवसेनेचे माजी आमदार आहेत. मुंबई महापालिकेत तीन वेळा नगरसेवक होण्याचा मान त्यांना मिळाला. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत समाधान सरवणकर हे देखील राजकारणात उतरले.

अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय 

सदा सरवणकर तीन वेळा आमदार झाले. मात्र, यंदाच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे हे देखील यंदाच्या निवडणुकीत सदा सरवणकर यांच्या विरोधात मैदानात होते. मात्र, दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला. सदा सरवणकर आणि अमित ठाकरेंची लढत झाल्याने थेट सदा सरवणकर  यांना पराभवाचा सामना करावा लागला.

वॉर्ड क्रमांक 194 येथून शिवसेनेतर्फे नगरसेवक

शिंदेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्यांपैकी एक सदा सरवणकर असून पक्षाच्या काही मोठ्या जबाबदाऱ्या या समाधान सरवणकर यांच्यावर आहेत. दादर, प्रभादेवी, वरळी या भागात सरवणकर कुटुंबियांचे राजकीय वलय बघायला मिळते. समाधान सरवणकर वॉर्ड क्रमांक 194 येथून शिवसेनेतर्फे नगरसेवक होते. आता सध्या ते शिवाजी पार्क जिमखान्याचे ते उपाध्यक्ष आहेत. अचानक समाधान सरवणकर यांनी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. अगदी कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा हा साखरपुडा पार पडलाय.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...