अभिनेत्री तेजस्विनी लोणारी होणार या बड्या शिवसेना नेत्याची सून, साखरपुड्याचा व्हिडीओ व्हायरल, गुपचूप…
Tejaswini Lonari Engagement : अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिच्या साखरपुड्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तिने चाहत्यांना गोड बातमी दिली. अभिनेत्री शिवसेनेच्या मोठ्या नेत्याची सून होणार आहे.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने आतापर्यंतच्या करिअरमध्ये हीट भूमिका दिल्या आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्री बिग बॉस सीजन 4 मध्येही धमाका करताना दिसली. तेजस्विनी लोणारी हिची फॅन फॉलोइंग जबरदस्त बघायला मिळते. अभिनेत्रीला तिच्या लग्नाबद्दल कायमच प्रश्न विचारले जायचे. मात्र, ती कोणाला डेट करंतय किंवा लग्नाबद्दल ती फार कधी जास्त बोलले नाही. आता नुकताच गुपचूप साखरपुडा उरकत अभिनेत्री चाहत्यांना मोठा धक्का दिला. होय… तुम्ही अगदी खरे ऐकले.. तेजस्विनी लोणारी हिने साखरपुडा केलाय. आता अभिनेत्रीच्या साखरपुडाचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होत असून त्यामध्ये ती किती आनंदी आहे हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतंय.
अभिनेत्री तेजस्विनी लोणारी होणार मोठ्या राजकीय घराण्याची सून
अभिनेत्री तेजस्विनी ही एका मोठ्या राजकीय घराण्याची सून होतंय. राज्यातील बड्या नेत्याच्या लेकासोबत तिचा साखरपुडा झाला. मात्र, तेजस्विनीचे लव्ह मॅरेज की अरेंज याबद्दल अजून तरी फार काही माहिती मिळू शकली नाही. तेजस्विनी लोणारी हिने शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांचा मुलगा आणि युवा नेते समाधान सरवणकर यांच्याशी साखरपुडा केला.
अभिनेत्रीच्या साखरपुड्याचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
गेल्या अनेक वर्षांपासून वडिलांप्रमाणेच समाधान सरवणकर राजकारणात सक्रिय आहे. विशेष: मुंबईतील वरळी भागात त्यांचा प्रभाव अधिक आहे. सदा सरवणकर हे शिंदे गटातील मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत. तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर यांनी नुकताच अगदी गुपचूपपणे आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये सारखपुडा केला. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीचा लूक जबरदस्त दिसतोय.
View this post on Instagram
तेजस्विनी लोणारीने उरकला गुपचूप साखरपुडा
दोघांनी एकमेकांच्या हातात अंगठी घातल्यानंतर तेजस्विनीच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसतोय. लाल रंगाच्या कपड्यांमध्ये तिचा लूक अजूनच उठून दिसतोय. अभिनेत्रीने अनेक हीट चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. आता साखरपुड्यानंतर समाधान सरवणकर आणि तेजस्विनी लोणारी लग्न नेमके कधी करणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय. तेजस्विनी लोणारी हिच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर चाहते तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत.
