AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजब-गजब चोरी ! गुपचूप यायचा, शेजारणीची अंडरगारमेंट्स चोरून न्यायचा, अटक होताच सांगितलं चक्रावणारं सत्य

पैसे किंवा मौल्यवान वस्तू चोरीच्या घटनांची चोरी झाल्याचं अनेकदा ऐकलं असेल. परंतु उज्जैनमध्ये एका तरुणाला शेजारणीचे अंडरगारमेंट्स चोरल्याबद्दल पकडण्यात आलं. पोलिसांनी त्याची चौकशी केल्यावर त्याने जे सांगितलं ते ऐकीन अधिकारीही आश्चर्यचकित झाले.

अजब-गजब चोरी ! गुपचूप यायचा, शेजारणीची अंडरगारमेंट्स चोरून न्यायचा, अटक होताच सांगितलं चक्रावणारं सत्य
अजब-गजब चोरी
| Updated on: Mar 14, 2026 | 3:31 PM
Share

मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये चोरीची एक अजब घटना उघडकीस आली आहे, ज्याबद्दल ऐकून सगळेच चक्रावलेत. ही काही साधीसुधी चोरी नव्हती आणि तो चोर पैसे किंवा मौल्यवान वस्तूही शोधत नव्हता. तो वारंवार एकाच घराबाहेर यायचा, आणि बाहेरच्या दोरीवर वाळत घातलेल्या कपड्यांमधून एका महिलेचे अंडरगारमेंट्स चोरून पळून जायचा. वाचून चक्रावलात ना. चोरी झाल्यावर आधी त्या कुटुंबाला वाटले की कोणीतरी मजा करत असेल, पण हाच प्रकार वारंवार घडू लागल्यावर मात्र सर्वांच्या डोक्यात संशयाचा किडा वळवळला. अखेर घराबाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली, तेव्हा एक धक्कादायक सत्य समोर आले.

ही घटना उज्जैनच्या चिमनगंज पोलिस स्टेशन परिसरातील धांडा भवन परिसरातील आहे. गेल्या काही दिवसांपासून एका कुटुंबाला एका विचित्र समस्येचा सामना करावा लागत होता. घरातील महिला दररोज दोरीवर कपडे वाळत घालायची, पण दुसऱ्या दिवशी काही कपडे गायब व्हायचे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, इतर कपडे सोडून फक्त त्या महिलेची अंडरगारमेंट्स गायब व्हायची. सुरुवातीला, कुटुंबाला वाटले की कोणीतरी  खोडसाळपणा करत असेल,  पण असं सारख व्हायला लागल्यावर त्यांना समजलं की हा प्रकार कोणीतरी मुद्दाम करत आहे. मग त्यांनी घराबाहेर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील रेकॉर्डिंग तपासले.

CCTV मध्ये कैद झाला चोर

पण फुटेज पाहून त्यांना धक्का बसला. व्हिडिओमध्ये रात्री उशिरा एक तरुण हळूहळू घराकडे येत असल्याचे स्पष्टपणे दिसलं. तो आधी आजूबाजूला पहायचा, कोणी येत नाही ना हे चेक करायचा आणि मग तो दोरीजवळ जायचा. वाळत घातलेले कपडे तिथे असायचे. काही सेकंदांनंतर तो त्या दोरीवरून महिलेचे अंडरगारमेंट्स काढून घ्यायचा आणि तिथून फरार व्हायचा. हे पाहून सगळे चक्रावले. असं कोणी का करेल, हेच त्यांना समजत नव्हतं. हा मामला अजब होता, म्हणून त्यांनी लगेच पोलिसांत तक्रार दाखल करत सीसीटीव्ही फुटेजही त्यांच्या ताब्यात दिलं.

पोलिसांच्या तपासत समोर आलं धक्कादायक सत्य

याबद्दल तक्रार मिळाल्यानंतर, चिमनगंज पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यांनी फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. फुटेजमधील तरुण त्याच भागातील असावा, असा संशय पोलिसांना आला. तपास पुढे सरकल्यावर त्यांना अंकित नावाच्या तरुणावर संशय आला. जेव्हा पोलिसांनी 25 वर्षीय अंकितला ताब्यात घेऊन चौकशी केली, तेव्हा त्याने सांगितलेल्या गोष्टीने पोलिसांनाही धक्का बसला.

एकतर्फी प्रेमाचा ज्वर

चौकशीदरम्यान, आरोपीने कबूल केलं की त्या परिसरात राहणाऱ्या विवाहित महिलेवर त्याचं प्रेम आहे. तो म्हणाला की त्याला ती महिला आधीपासूनच आवडायची. हे आकर्षण हळूहळू वेडात बदलले. त्यामुळेच तो तिच्या घराबाहेर जाऊन, तिथे वाळत घातलेले अंडरगारमेंट्स चोरू लागला.  आरोपीच्या कारवाया अनेक दिवसांपासून सुरू होत्या, परंतु कोणालाही हे लक्षात आलं नाही. आणि जर सीसीटीव्ही फुटेज समोर आले नसते तर ही विचित्र चोरी आणखी काळ चालू राहिली असती, असं पोलिसांनी सांगितलं.

छातीवर महिलेच्या नावाचा टॅटू

तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक गोष्ट उघडकीस आली. आरोपी अंकितने त्याच्या छातीवर विवाहित महिलेच्या नावाचा टॅटू गोंदवला होता. त्या तरुणाचे अविवाहित महिलेवरचं प्रेम वेडाच्या टोकाला पोहोचल्याचं पोलिसांना समजलं.

सध्या पोलिसांनी आरोपी अंकितला अटक केली आहे आणि त्याची चौकशी करत आहेत. हे प्रकरण आता संपूर्ण उज्जैनमध्ये चर्चेचा विषय ठरलं आहे.

Follow Us
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी....
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी.....
नाशिक IT प्रकरण, फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाख
नाशिक IT प्रकरण, फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाख.
उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर
उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर.
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर...
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर....
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!.
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन.
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का.
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल.
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी.