AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Points Table : हैदराबादला मुंबई विरुद्धच्या विजयानंतर मोठा फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी?

IPL 2026 Points Table : हैदराबादला या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे. तर मुंबईच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईचं या पराभवानंतर प्लेऑफमध्ये पोहचणं अवघड झालं आहे.

IPL 2026 Points Table : हैदराबादला मुंबई विरुद्धच्या विजयानंतर मोठा फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी?
Heinrich Klaasen and Salil AroraImage Credit source: Bcci
| Updated on: Apr 30, 2026 | 6:55 AM
Share

सनरायजर्स हैदराबादने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 41 व्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. हैदराबादने मुंबई इंडियन्सचा त्यांच्याच घरच्या मैदानात अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये 6 विकेट्सने धुव्वा उडवला. मुंबईने रायन रिकेल्टन याने केलेल्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर हैदराबादसमोर 244 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हैदराबादने हे आव्हान एकतर्फी फरकाने सहज पूर्ण केलं. हैदराबादला या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे. तर मुंबईच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईचं या पराभवानंतर प्लेऑफमध्ये पोहचणं अवघड झालं आहे.

हैदराबादने 244 धावांचा विजयी आकडा गाठताच अनेक विक्रम आपल्या नावावर केले. हैदराबादने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील चौथ्या सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. तसेच हैदराबादने पंजाबचा विक्रम मोडीत काढत मुंबई विरुद्ध सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करणारी टीम हा बहुमान मिळवला. याआधी पंजाबने मुंबई विरुद्ध 204 धावांचं लक्ष्य गाठलं होतं. मुंबईची अशाप्रकारे 200 पेक्षा अधिक धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरण्याची ही दुसरी वेळ ठरली.

हैदराबादचा एकूण 100 वा विजय

हैदराबादसाठी मुंबई विरुद्धचा विजय आणखी एका कारणाने खास ठरला. मुंबईला पराभूत करुन हैदराबादने आयपीएल स्पर्धेत 100 वा विजय पूर्ण केला. हैदराबादला या विजयानंतर एका स्थानाचा फायदा झाला आहे.

हैदराबादची तिसऱ्या स्थानी झेप

हैदराबादने विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये टॉप 3 मध्ये धडक दिली आहे. हैदराबाद राजस्थान रॉयल्सला मागे टाकत तिसऱ्या स्थानी पोहचली आहे. हैदराबाद या सामन्याआधी चौथ्या तर राजस्थान तिसऱ्या स्थानी होती.

ताज्या आकडेवारीनुसार, हैदराबादच्या खात्यात 9 सामन्यानंतर 12 गुण आहेत. हैदराबादला 3 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं आहे. तसेच हैदराबादचा नेट रनरेट हा विजयानंतर +0.832 असा झाला आहे जो सामन्याआधी +0.815 असा होता. तर राजस्थानची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.

पहिल्या स्थानी कोण?

दरम्यान पॉइंट्स टेबलमध्ये पंजाबच किंग्स आहे. पंजाबने आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. पंजाबच्या खात्यात 8 सामन्यांनंतर 13 गुण आहेत. पंजाबने या 8 पैकी 6 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. पंजाबचा एकाचा सामन्यात पराभव झालाय. तर पंजाबचा केकेआर विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. पंजाब +1.043 अशा नेट रनरेटसह पहिल्या स्थानी आहे. त्यानंतर गतविजेता आरसीबी दुसऱ्या क्रमांकावर आहे. आरसीबीनेही पंजाबप्रमाणे 8 पैकी 6 सामने जिंकलेत आरसीबीच्या खात्यात 12 गुण आहेत. आरसीबीचा नेट रनरेट हा +1.919 असा आहे. हैदराबाद विजयानंतर तिसऱ्या स्थानी आहे. तर राजस्थानची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. बाकी इतर संघांची स्थिती जैसे थेच आहे.

Follow Us
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण... जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं?
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा; काय घडलं?
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
Video | 'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर फडणवीसांचा राऊतांना मिश्कील टोला
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?