AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1.4 मिलियन फॉलोअर्स, चाहत्यांना सबस्क्रिप्शन देऊन शेअर केले असे फोटो.. थेट केस दाखल

या प्रसिद्ध अभिनेत्रीविरोधात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. इन्स्टाग्रामवर तिचे 1.4 दशलक्ष फॉलोअर्स असून सबस्क्रिप्शनची ऑफर देऊन तिने असे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले, ज्यानंतर तिच्याविरोधात थेट तक्रार दाखल करण्यात आली.

1.4 मिलियन फॉलोअर्स, चाहत्यांना सबस्क्रिप्शन देऊन शेअर केले असे फोटो.. थेट केस दाखल
vishnu priya bhimeneni Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 15, 2026 | 12:21 PM
Share

विष्णू प्रिया भिमेनेनी.. सोशल मीडियावर सध्या हे नाव अचानक चर्चेत आलं आहे. यामागचं कारण म्हणजे तिच्याविरोधात झालेले सायबर क्राइमचे दोन केस. दोन दिवसांपूर्वीच विजयवाडामध्ये विष्णु प्रियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. इन्स्टाग्रामवर सबस्क्रिप्शनची ऑफर देऊन अश्लीलता पसरवण्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. 36 वर्षीय या अभिनेत्रीविरोधात ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या (AISF) सदस्यांनी तक्रार दाखल केली होती. इन्स्टाग्रामवर ती सबस्क्राइबर्ससोबत जो कंटेट शेअर करते, तो अत्यंत अश्लील आणि न्यूडिटी पसरवणारे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत विष्णु प्रिया भिमेनेनी हा एक प्रसिद्ध चेहरा आहे. ‘डेक्कन क्रॉनिकल’ने दिलेल्या वृत्तानुसार, तक्रार मिळाल्यानंतर विजयवाडा सायबर क्राइम पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विष्णु प्रियाने तेलुगू चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत काम केलंय. नागार्जुन सूत्रसंचालन करत असलेल्या ‘बिग बॉस तेलुगू’च्या आठव्या सिझनमध्ये ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संघटनेचं म्हणणं आहे की, अशा कंटेंटचा तरुणाईवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. इन्स्टाग्रामवर लाखोंनी फॉलोअर्स असतानाही एखाद्या सेलिब्रिटीने अशा प्रकारची अश्लीलता पसरवणं हे घाणेरडं कृत्य असल्याचं त्यांनी म्हटलंय. काही दिवसांपूर्वीच तमिळ अभिनेत्री अभिरामी वेंकटाचलमने तिच्या इन्स्टाग्राम सबस्क्राइबर्सना झापलं होतं. मी इथे माझे निर्वस्त्र होण्यासाठी आले नाही, असं म्हणत तिने अश्लील मागणी करणाऱ्यांना फटकारलं होतं. अभिरामीच्या उलट विष्णु प्रियाचं कृत्य असल्याने सोशल मीडियावर ती चर्चेत आली आहे.

विष्णु प्रियाचा जन्म 22 फेब्रुवारी 1990 रोजी हैदराबादमध्ये झाला. तेलुगू फिल्म इंडस्ट्रीत ती विष्णु प्रिया नावाने ओळखली जाते. ती अभिनेत्री, डान्सर आणि मॉडेल आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. यावरून तिच्या लोकप्रियतेचा अंदाज लावला जाऊ शकतो. तिने ‘वाँटेड पांडुगोड’, ‘चेक मेट’, ‘द 100’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय तिने ओटीटीवर ‘दया’ या तेलुगू वेब सीरिजमध्येही काम केलंय. बिग बॉसच्या घरातही तिचा दबदबा पहायला मिळाला होता. 98 दिवस घरात राहिल्यानंतर ती बाद झाली होती.

Follow Us
मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन
Mumbai DJ Ban | मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन भारतींची मोठी घोषणा
मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
Dahi Handi in Mumbai | कालपर्यंत परवानगी, रात्री अचानक नकार! मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा!
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सारथी शिष्यवृत्तीवरील खर्च मर्यादेवर मोठा निर्णय
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
Thackeray Group Dahihandi | मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष बघाच
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह; मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत