Article 370 | काश्मीर फाइल्सनंतर आता ‘आर्टिकल 370’ कमाल करण्याच्या मार्गावर, भल्या-भल्यांचा अंदाज चुकवला

| Updated on: Mar 04, 2024 | 11:19 AM

Article 370 | वर्ष 2024 मध्ये बॉलिवूड चित्रपटांची सुरुवात तशी थंडच झाली. बॉलिवूडचे चित्रपट काही खास कमाल दाखवू शकलेले नाहीत. कमी बजेटच्या चित्रपटांनी मोर्चा संभाळला आहे. फिल्मच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे ताजे आकडे समोर आले आहेत.

Article 370 | काश्मीर फाइल्सनंतर आता आर्टिकल 370 कमाल करण्याच्या मार्गावर, भल्या-भल्यांचा अंदाज चुकवला
Article 370 yami gautam Film
Follow us on

Article 370 News | यामी गौतमच्या जबरदस्त Action ने भरलेला आर्टिकल 370 चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सरकारच्या ऐतिहासिक निर्णयामागाची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाने हळूहळू ग्रीप घेतली असून दिवसेंदिवस या चित्रपटाच्या कमाईचा आकडा वाढत चाललाय. Article 370 चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली आहे. चित्रपट रिलीज होऊन 10 दिवस झालेत. या चित्रपटाच्या कमाईचा आकडा वाढतच चालला आहे. वीकेंड असो, किंवा वीकडेज दरदिवशी तिकीट बारीवर हा चित्रपट कमाल करतोय. त्यामुळेच हा चालू वर्षातील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला आहे. आर्टिकल 370 चित्रपटाच्या कमाईचे ताजे आकडे आले आहेत.

बॉक्स ऑफिसच्या वर्ल्डवाइड रिपोर्ट्सनुसार, यामी गौतमचा आर्टिकल 370 वर्षातील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने 70 कोटी कमावले, तर याला सुपरहिटचा दर्जा मिळेल. हा यामी गौतमचा दुसरा सुपरहिट चित्रपट ठरेल. 10 व्या दिवशी या चित्रपटाने 6.20 कोटीची कमाई केली. 10 दिवसात या चित्रपटाने 53.39 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाच हे शानदार कलेक्शन आहे. आणखी 17 कोटी कमावल्यास या चित्रपटाचे कलेक्शन 70 कोटी होईल.

आर्टिकल 370 काश्मीर फाइल्सच्या वाटेवर

वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस कलेक्शननुसार, हा चित्रपट परदेशातही चालतोय. फिल्मच वर्ल्डवाइड कलेक्शन 65 कोटी पर्यंत पोहोचलय. पुढच्या चार दिवसात कुठलाही चित्रपट रिलीज होणार नाहीय. किरण रावच्या लापता लेडीजच चांगली सुरुवात केलीय. पण त्याचा यामीच्या चित्रपटाच्या कमाईवर काहीही परिणाम झालेला नाही. हा चित्रपट अजून किती कमाई करतो, ते दिसेलच. अंदाजानुसार, हा चित्रपट भारतात 75 कोटी आणि जगभरात 100 कोटीची कमाई करु शकतो. काश्मीर फाइल्स चित्रपटाने सुद्धा हळूहळू जनमानसाची पकड घेतली होती. आता आर्टिकल 370 सुद्धा त्याच वाटेवर आहे.