Yeh Prem Mol Liya Box Office : शर्वरीच्या ‘ये प्रेम मोल लिया’ चित्रपटाची सरशी, जिनिलियाच्या ‘गनमास्टर G9’ ला मागे टाकत केली कोट्यावधींची कमाई
बॉक्स ऑफिसवर सध्या शर्वरी वाघ आणि आयुष्यमान खुराना यांच्या ये प्रेम मोल लिया या चित्रपटाची जिनिलियाच्या गनमास्टर जी9 सोबत टक्कर पाहायला मिळत आहे. 27 नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या दोन्ही चित्रपटांमध्ये दुसऱ्या दिवशी आयुष्यमानच्या चित्रपटाने बाजी मारली

बॉक्स ऑफिसवर सध्या शर्वरी वाघ आणि आयुष्यमान खुराना यांच्या ये प्रेम मोल लिया या चित्रपटाची जिनिलियाच्या गनमास्टर जी9 सोबत टक्कर पाहायला मिळत आहे. 27 नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या दोन्ही चित्रपटांमध्ये दुसऱ्या दिवशी आयुष्यमानच्या चित्रपटाने बाजी मारली. म्हणजेच ये प्रेम मोल लिया या चित्रपटाच्या कमाईत तब्बल 31.3 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे या चित्रपटाने जिनिलियाच्या अॅक्शनपटला मागे टाकलं आहे.
दुसऱ्या दिवशी ये प्रेम मोल लिया ची किती कमाई केली
ये प्रेम मोल लिया ने दुसऱ्या या दिवशी भारतात 5.25 कोटी रूपयांची निव्वळ कमाई केली. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 4 कोटी रूपये कमावले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या कमाईत 31.3 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. दोन दिवसांत चित्रपटाची भारतातील एकूण निव्वळ कमाई 9.25 कोटी रूपये, तर एकूण ग्रॉस कमाई 11 कोटी रूपये झाली आहे.
दुसऱ्या दिवशी चित्रपटाचे देशभरात 7, 126 शो झाले. या शोमध्ये सरासरी 14 टक्के प्रेक्षकांची उपस्थिती होती. शनिवारी चित्रपटाची सुमारे 2 लाख 38 हजार 675 तिकिटं विकली गेली. परदेशातील कमाईचा विचार केला. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 4 कोटी रूपये कमावले. त्यामुळे परदेशातील एकूण ग्रॉस कमाई 7.75 कोटी रूपयांवर पोहोचली. भारत आणि परदेशातील कमाई मिळून चित्रपटाची दोन दिवसांची जगभरातील एकूण ग्रॉस कमाई 18.75 कोटी रूपये झाली आहे.
जिनिलियाचा गनमास्टर जी 9 किती मागे?
दुसरीकडे इमरान हाश्मीच्या गनमास्टर जी9 ने दुसऱ्या दिवशी भारतात 4.35 कोटी रूपयांची निव्वळ कमाई केली. या चित्रपटाचे 7.591 शो झाले होते. पहिल्या दिवसाची कमाई 3.65 कोटी रूपये होती. त्यामुळे दोन दिवसांत भारतातील एकूण निव्वळ कमाई 8 कोटी रूपये, तर ग्रॉस कमाई 9.50 कोटी रूपये झाली.
परदेशातील मार्केटमध्ये या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 50 लाख रूपये कमावले. त्यामुळे परदेशातील एकूण ग्रॉस कमाई 80 लाख रूपये झाली आहे. भारत आणि परदेशातील कमाई मिळून गनमास्टर जी 9 ची दोन दिवसांची जगभरातील एकूण ग्रॉस कमाई 10.30 कोटी रूपये झाली आहे.
सध्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईत शर्वरीचा चित्रपट पुढे असला तरी आगामी दिवसांत प्रेक्षकांचा प्रतिसाद कोणत्या चित्रपटाला अधिक मिळतो. हे पाहणं महत्त्वाचं ठरतं.