AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणमध्ये खेळण्याच्या वादातून १४ वर्षीय मुलाला पाच जणांची बेदम मारहाण; पालकांनाही सोडले नाही, संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद!

लहान मुलांच्या खेळण्यावरून सुरू झालेला वाद विकोपाला. रिक्षेत लपलेल्या मुलाला बाहेर खेचून लाथाबुक्क्या आणि काठ्यांनी मारहाण. दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी गुन्हे दाखल.

कल्याणमध्ये खेळण्याच्या वादातून १४ वर्षीय मुलाला पाच जणांची बेदम मारहाण; पालकांनाही सोडले नाही, संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद!
| Edited By: | Updated on: Nov 29, 2026 | 4:26 PM
Share

कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात लहान मुलांच्या खेळण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हिंसक मारहाणीत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १४ वर्षीय मुलाला पाच जणांनी मिळून बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला असून, मुलाच्या आई-वडिलांसह कुटुंबीयांनाही मारहाण करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेचा थरारक प्रकार सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथील श्री लक्ष्मी हाऊसिंग सोसायटीमध्ये २८ नोव्हेंबर रोजी रात्री ही घटना घडली. आठवीत शिकणारा १४ वर्षीय प्रबुद्ध साळवे हा आपल्या मित्रासोबत खेळण्यासाठी सोसायटीत गेला होता. यावेळी त्याचा यग्नेश नावाच्या मुलासोबत खेळण्यावरून वाद झाला. या वादानंतर मारहाण होण्याच्या भीतीने प्रबुद्धने सोसायटीतील एका रिक्षेत जाऊन आश्रय घेतला.

मात्र, यग्नेशच्या कुटुंबीयांना प्रबुद्ध रिक्षेत लपल्याची माहिती मिळताच यग्नेशचे आई-वडील, काका-काकू आणि आजोबा अशा पाच जणांनी रिक्षेत शिरून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला रिक्षेबाहेर खेचून लाथाबुक्क्या आणि काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये राजेंद्र माळी याने लाकडी दांडक्याने प्रबुद्धच्या डाव्या मांडीवर वार केल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, आपल्या मुलाला मारहाण का केली, असा जाब विचारण्यासाठी प्रबुद्धचे आई-वडील आणि कुटुंबीय गेले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. ‘आमच्या सोसायटीत का आलात?’ असा सवाल करत ‘हो, तुमच्या मुलाला मी मारले,’ असे सांगून आरोपींनी कुटुंबीयांशी वाद घातल्याचा आरोप आहे.

या मारहाणीत जखमी झालेल्या प्रबुद्धवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी अर्जुन सुकलाल माळी, जितेंद्र अर्जुन माळी, राजेंद्र अर्जुन माळी, त्रिवेणी जितेंद्र माळी आणि गायत्री राजेंद्र माळी या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दुसरीकडे, यग्नेशच्या आई-वडिलांनीही साळवे कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली असून, त्यानुसार तीन ते चार जणांविरोधात परस्पर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या खडकपाडा पोलिसांकडून दोन्ही बाजूंच्या तक्रारींच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.

लहान मुलांच्या खेळण्यावरून सुरू झालेल्या वादात एका अल्पवयीन मुलासह त्याच्या कुटुंबीयांना मारहाण झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Follow Us
मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटल यांना...
Raksha Khadse : मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटलांना दिलं प्रत्युत्तर!
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; मोदी
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; म्हणाले, मोदींचे निर्णय ऐतिहासिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी दिले स्पष्ट निर्देश!
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बन...
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बनांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...
विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' राऊतांचा
Sanjay Raut : 'विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' संजय राऊतांचा दावा
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक...
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा!
शरद पवारांच्या NCP ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे...
शरद पवारांच्या NCP  ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे; काँग्रेस नेत्याचे पुन्हा आवाहन!