AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुला तर झाडूवाल्याची नोकरीही मिळाली नाही’, राखी सावंतच्या वक्तव्यावर कंगना रनौतचा संताप

सोशल मीडियावर आपल्या हटके लुकने नेहमी चर्चेत असणाऱ्या राखी सावंतच्या वक्तव्यावर कंगना रणौतने संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने आपली संताप व्यक्त केला आहे.

'तुला तर झाडूवाल्याची नोकरीही मिळाली नाही', राखी सावंतच्या वक्तव्यावर कंगना रनौतचा संताप
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 15, 2026 | 2:38 PM
Share

अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्री राखी सावंतने कंगना, अभिनेत्री-नेत्या स्मृती इराणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर कंगनाने जोरदार पलटवार केला आहे. राखीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना कंगनाने तिला ‘अपयशी आणि कडवटपणाने भरलेली’ व्यक्ती संबोधलं.

कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. यशस्वी महिलांना त्यांच्या यशामुळे लक्ष्य करणारे अनेक लोक असतात असं म्हणत तिने अशा लोकांवर निशाणा साधला. मत्सर, अपयश आणि अहंकारातून काही लोक यशस्वी महिलांच्या चारित्र्यावर चिखलफेक करतात असा आरोप कंगनाने केला.

तिने पुढे म्हटलं की, वारंवार होणाऱ्या अशा जाणीवपूर्वक हल्ल्यांना आणि सार्वजनिक चारित्र्यहननाला बळी पडणं आता थांबवलं पाहिजे. अशा लोकांना वारंवार स्पष्टीकरण देण्याची किंवा त्यांच्या वक्तव्यांमुळे अपमानित आणि दुखावून घेण्याची गरज नाही, असंही कंगनाने म्हटलं.

‘माझ्यासारखं यश मिळवून दाखवा’

राखीवर टीका करताना कंगनाने अत्यंत आक्रमक शब्दांत उत्तर दिलं. ‘तुम्ही यश मिळवण्यासाठी काहीही करण्यास तयार असाल पण दुर्दैवाने कोणालाही तुमच्याकडून काहीही नको आहे,’ अशा शब्दांत तिने टोला लगावला. याशिवाय आपल्या रील्स पाहत बसून टीका करत राहा असं म्हणत कंगनाने राखीला थेट सुनावलं.

कंगनाने यापूर्वीही तिच्यावर टीका करणाऱ्या अनेक सेलिब्रिटींना उत्तर दिलं होतं. आशुतोष राणा, सोनू सूद, राखी सावंत आणि तापसी पन्नू यांचा उल्लेख करत तिने या कलाकारांनी आपल्याबद्दल केलेल्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली होती.

‘जर तुम्ही माझ्या यशाच्या एक टक्काही यश मिळवलं नसेल, तर तुमच्या मतांमध्ये मला रस नाही,’ अशी भूमिका कंगनाने यावेळी मांडली. आपल्यापेक्षा अधिक यशस्वी व्यक्तींचं मतच आपण ऐकणार असल्याचंही तिने स्पष्ट केलं.

kangana ranaut slams rakhi

कंगना-राखीचा वाद नवा नाही

कंगना रणौत आणि राखी सावंत यांच्यात यापूर्वीही सोशल मीडियावर आणि सार्वजनिक व्यासपीठावरून शाब्दिक वाद झाले आहेत. काही काळापूर्वी दिल्लीतील एका आंदोलनाबाबत कंगनाने केलेल्या वक्तव्यावर राखीने व्हिडीओ शेअर करत तिच्यावर टीका केली होती. त्यानंतर कंगनानेही राखीला आणि तिच्यावर टीका करणाऱ्या इतर कलाकारांना प्रत्युत्तर दिलं होतं.

Follow Us
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी...
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पांचे दर्शन, पहा खास व्हिडीओ
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट; भाजपचा पलटवार!
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, ड्रोन...
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, पाहा ड्रोन दृश्य...
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुर
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुरांसाठी 25 हजारांची मागणी
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले...
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले यांचे मोठे विधान
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध...
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध पास असूनही पोलिसांची अडवणूक
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार, मुंबईला रवाना
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?